सिनेमा/ॲनॉटॉमी ऑफ ए फॉल
सॅम्युअल एक फ्रेंच लेखक आहे. सँड्रा एक जर्मन लेखक आहे. पतीपत्नी. त्यांना डॅनियल नावाचा मुलगा आहे. डॅनियल बारा वर्षाचा आहे, एका अपघातात चौथ्या वर्षी त्याची दृष्टी अधू झालीय. सॅम्युअलसोबत दुचाकीवरून जात असताना अपघात झाल्यानं सॅम्युअलला एक गुन्हागंड आहे, आपल्यामुळं त्याची दृष्टी अधू झाली असं त्याला वाटतं.तिघंही स्वित्झर्लंडमधे आल्प्स पर्वत प्रदेशात एका शॅलेमधे (विशिष्ट प्रकारचं लाकडी घर) रहात आहेत. सॅम्युअलला पुस्तक लिहायचंय, त्यासाठी तो नोकरी सोडून इथं आलाय. शॅलेच्या तिसऱ्या मजल्यावरून सॅम्युअल खाली पडतो. मरतो. खून केल्याचा आरोप सँड्रावर येतो. कोर्टात…