रविवारचा लेख. पॅलेस्टिनी लोकांनी हा आत्मघातकी मार्ग कां पत्करला
सात ऑक्टोबरला गाझा पट्टीतून पाचेक हजार रॉकेटं निघाली आणि इसरायलमधे कोसळली. काही शेकडा पॅलेस्टिनी कमांडो पारंपरीक (अत्याधुनिक नसलेल्या) बंदुका घेऊन इस्रायलमधे घुसले. ते आल्यावर स्थानिक पोलीस आणि सैनिक जीव घेऊन पळत सुटले, लढले नाहीत. काही डझन सैनिक आणि इस्रायली नागरिकांना या कमांडोनी ओलिस ठेवलं. हँडग्रेनेड आणि आयईडी ओलिसांच्या अंगावर लावलेले होते, याद राखा, कारवाई केली तर तुमची माणसं उडवून देऊ. असं काही घडेल याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती. इसरायलची मोसाद आणि शिन बेट ही इंटेलिजन्स यंत्रणा जगातली सर्वात कार्यक्षम…