रविवारचा लेख निवडून येणारा हुकूमशहा
लोकशाहीच्या वाटेनं हुकूमशहा होणाऱ्या पुढाऱ्यांच्या मांदियाळीत आता एका नव्या माणसाची भर पडतेय. आफ्रिकेच्या उत्तरेतला, भूमध्य समुद्राच्या काठावरच्या ट्युनिशियाचे प्रेसिडेंट कैस सईद. देशाचं कल्याण कशात आहे (देशाचं याचा अर्थ सईद यांचं) हे सईद ठरवतात आणि देशानं त्यांच्या ‘हो’ला ‘हो’ करायचं. ते म्हणतील की त्यांच्या आज्ञेवरून सूर्य पश्चिमेला उगवतो. जनतेनं होकार भरायचा. त्यांचा ताजा विचार असा. ट्युनिशिया या देशाची वाट देशातल्या काळ्यां लावलीय. महागाई वाढलीय, काळे जबाबदार. जीवनावश्यक वस्तू सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्यात, देशात बेकारी वाढलीय, काळे जबाबदार. आमचा देश अरब आहे….