रविवारचा लेख अफगाणिस्तान जगात किती नंबरचा श्रीमंत देश होणार?
अफगाणिस्तानातून नेहमी बाहेर येणाऱ्या बातम्या तालिबानच्या अत्याचारी, दहशतवादी, दंडेली वर्तणुकीच्या असतात. स्त्रियांना घरात डांबलं जातंय; सदाचरण केलं नाही तर फटके मारले जातायत; विरोधकाना तुरुंगात डांबलं जातय; इत्यादी. अशा अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर औद्योगीक खणती होऊ घातलीय, चीन अफगाणिस्तानात शिरतोय हे आपल्या कानावर फारसं पडत नाही. २००२ साली एक वू नावाचा माणूस नशीब काढायला काबूलमधे पोचला. त्यानं खटपट करून त्या काळातल्या अफगाण सरकारशी संधान बांधून यथावकाश एक पोलाद तयार करण्याचा कारखाना सुरु केला. अफगाणिस्तानमधला पहिला पोलाद कारखाना. भंगारातलं लोखंड वितळवून त्यातून पोलाद…