वॅग्नर सेनेनं उडवलेली धमाल. लेख क्र. १
२३ जून २०२३ रोजी वॅग्नर सेनेनं रशियाच्या नैऋत्येला युक्रेनच्या हद्दीवरच्या Rostov-on-Don या गावातल्या रशियन सैन्याच्या ठाण्याच्या ताबा घेतला. ते ठाणं म्हणजे रशियन सैन्याचं विभागीय मुख्यालय होतं. वॅग्नर ग्रुप, वॅग्नर सेना हे एक खाजगी सैन्य आहे. वॅग्नर सेनेचे प्रमुख येवजेनी प्रिगोझीन यांनी जाहीर केलं की त्यांचं सैन्य रशियाची राजधानी मॉस्कोच्या दिशेनं कूच करणार आहे. एका खाजगी सेनेनं एका देशाची राजधानी ताब्यात घ्यायचं जाहीर केलं होतं. वॅग्नर कोणत्याही देशाचं सैन्य नाही. या सैन्यात नेमके किती सैनिक आहेत माहित नाही पण ३० ते…