घातक औषधं विकणारा उघडा पाडला एका फोटोग्राफरनं
All the Beuty and the Bloodshed. || प्रस्तुत माहितीपट अमेरिकन सामान्य माणसाला, विशेषतः भारतीय माणसाला, हादरवून टाकणारा, एक अगदीच नवं जग दाखवणारा आहे. हा माहितीपट समाजाच्या परिघावरच्या माणसांचं जगणं दाखवतो आणि समाजाच्या मध्यभागी राहून समाजाचं जगण हिरावून घेणारी माणसं दाखवतो. नॅन गोल्डिन ही फोटोग्राफर. तिचं लहानपण फार तणावाचं. आई वडिलांचं पटत नसे, वडील आईला मारझोड करत असत. तिची मोठी बहीण. बंडखोर होती. आत्यंतिक तणावाखाली वाढली. तिनं आत्महत्या केली. नॅनवर बहिणीचा प्रभाव.नॅनही मानसिक क्लेषातच वाढली. घराबाहेर पडली. एका मित्राबरोबर रहायला गेली….