लोकशाही न जुमानणारा प्रेसिडेंट
अमेरिकेत एक इंटरेस्टिंग घटना घडतेय. अमेरिकेतल्या एफबीआय या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेनं माजी प्रेसिडेंट ट्रंप यांच्या फ्लोरिडातल्या घरी आपले पोलीस (एजंट) पाठवले. ट्रंप यांनी काही सरकारी दस्तैवज बेकायदा रीतीनं पळवून घरात साठवले आहेत असा आरोप ठेवून एफबीआयनं छापा घातला. काही खोके भरून कागद गोळा केले. अमेरिकेत एक कायदेशीर तरतूद आहे की क्लासिफाईड माहिती असलेले कागद प्रेसिडेंट स्वतःच्या ताब्यात ठेवू शकत नाही, ते कागद त्याला राष्ट्रीय संग्रहात पाठवावे लागतात. या तरतुदीनुसार प्रत्येक अध्यक्ष जेव्हां पायउतार होतो तेव्हां घरी परतताना क्लासिफाईड कागद व्हाईट…