फरा आणि काश्मिर फाईल्स
फरा (Farah) याच शीर्षकाचा चित्रपट , फरा या १४ वर्षाच्या पॅलेस्टिनी मुलीची गोष्ट सांगतो. गोष्ट सरळ रेषेत जाणारी आहे. १९४८ साल आहे. स्थळ आहे पॅलेस्टाईन. बाहेरून आलेल्या ज्यूंनी पॅलेस्टाईन भूमीचा ताबा घेतलाय. एकेका गावात घुसून ते स्थानिक पॅलेस्टिनी लोकांना ठार करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात. त्यांना मारून टाकतात. त्यांना गाव सोडून निघून जायला सांगतात. गावाचा कब्जा घेतात. तिथं इस्रायल नावाचा देश तयार करतात. सात लाख पॅलेस्टिनी या घटनाक्रमात मारले गेले/ विस्थापित झाले. इस्रायलनं पॅलेस्टाईन व्यापणं आणि त्यात झालेली हिंसा या घटनेचं वर्णन अरबी भाषेत नकबा असं करतात….