‘चुप’ आणि ‘कंतारा’
कंतारा नावाचा सिनेमा सध्या मुंबईतल्या अनेक सिनेमाघरात चाललाय. ऋषभ शेट्टी नावाच्या माणसानं या सिनेमात आपली हौस भागवून घेतलीय. शेकडो नव्हे हजारो वर्षांची जुनी दंतकथा त्यानं थेट २०२२ मधे आणून ठेवलीय. देव, पौराणीक माणसं ते थेट फॉरेस्ट ऑफिसर आणि जंगलात रहाणारी माणसं आणि गावातला एक भ्रष्ट बटबटीत पुढारी.कथा त्याची, दिक्दर्शन त्याचं, हीरोही तोच. हीरो नावाच्या भूमिकेला ज्या ज्या करामती करून लोकांचं लक्ष वेधावं लागतं त्या साऱ्या करामती; सेक्स, मारामारी, विनोद, रेडा शर्यत, राजकीय नेतृत्व; सारं सारं शेट्टीनं या सिनेमात कोंबलंय. तोच…