देशप्रमुख गुन्हेगार असला तरी त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं.
१५ जुलै २०२२ ला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सौदी अरेबियात गेले. तिथं त्यांनी सौदी अरेबियाचे राजपुत्र बिन सलमान यांच्याशी वाटाघाटी केल्या. बिन सलमान राजपुत्र असले तरी खरं म्हणजे राजेच आहेत, तेच सगळा कारभार हाकत असतात. वडील जिवंत आहेत म्हणूनच ते राजपुत्र आहेत येवढंच. बायडन यानी आपल्या निवडणुक प्रचार मोहिमेत बिन सलमान यांना बहिष्कृत करू असं म्हटलं होतं. ज्याला बहिष्कृत करायचं म्हणत होते त्याच्याशी हात मिळवणी? हात मिळवणी नाही म्हणता येणार. हात एकमेकाच्या हातात घेण्याऐवजी मुठी एकमेकावर आदळल्या, मूठभेट घेतली. तांत्रीकदृष्ट्या बायडन…