अनेक. पोलिटिकल थ्रिलर.
‘ अनेक ‘ या नावाचा सिनेमा आला आणि गेला. पोलिटिकल थ्रिलर. किती लोकांना पाहिला कुणास ठाऊक. माझ्या जवळच्या सिनेघरात एकच शो होता. रविवार असूनही सिनेघरात मी धरून २३ लोक होते. त्यातले दोघे जण जेमतेम मध्यंतरापर्यंत होते, मध्यंतरात बाहेर पडले ते गुलच झाले. बाहेर पडताना ते सिनेमाला शिव्या देत होते. शिव्या म्हणजे शिव्या. त्यांना सिनेमात काय आहे ते कळत नव्हतं. ते स्वाभाविकच म्हणायला हवं. एका जॉन्सन नावाच्या माणसाचा सतत उल्लेख येतो आणि जॉन्सन काही दिसत नाही. सिनेमाच्या टोकाला उलगडत की जॉन्सन…