अण्णा आणि अरविंद
आप अँड डाऊन. ।। अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल ही दोन माणसं गेली वीसेक वर्षं सतत बातम्यांमधे असतात. कधी ते लोकप्रियतेच्या शिखरावर असतात तर कधी टीकेचे बळी ठरलेले असतात. ते मधे मधे झाकोळल्यासारखे वाटतात, पण मावळत नाहीत, चमकू लागतात. भारतातलं राजकीय वातावरण गरगर ढवळून काढणाऱ्या या दोन व्यक्तींच्या अंतरंगाची काहीशी कल्पना आप अँड डाऊन हे प्रस्तुत पुस्तक देतं. पुस्तक २०१८ साली प्रसिद्ध झालंय लेखक आहेत, मयंक गांधी. गांधीची दोन प्रमुख वैशिष्ट्यं. ते अर्बन प्लानर आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहे. व्यवस्थापन…