गळेचेपी तंत्रज्ञान,पेगॅसस,भारत सरकार.
हेरगिरीचं पेगॅसस हे तंत्र भारत सरकार वापरतं की नाही? या प्रश्नाचं उत्तर भारत सरकार देत नाहीये. या बाबत प्रश्न विचारल्यावर सरकार म्हणतं की प्रकरण कोर्टात आहे. पेगॅसस हे टेलेफोन दळणवळणाची चोरी करणारं तंत्रज्ञान आहे. एक यंत्र असतं. ते दुरून किवा प्रत्यक्ष टेलेफोनमधे, इंटरनेटमधे, घुसून संभाषणं, दिले घेतले जाणारे मेसेजेस पळवतं. इस्रायलमधल्या आयएसओ या कंपनीनं ते तंत्रज्ञान विकसित केलंय, ते यंत्र विकसित केलंय. या यंत्राची टेलेफोनना चिकटण्याची क्षमता मर्यादित असते. पन्नास फोन, शंभर फोन अशा क्षमता असतात. जेवढी क्षमता जास्त तेवढी यंत्राची किमत…