वंशवाद. माणसानंच जन्माला घातलाय.
How to Argue With a Racist: History, Science, Race and Reality. Adam Rutherford. 224 pages Publisher : W&N. || पंधरासोळाव्या शतकातल्या अज्ञानातून जन्मलेला वंशवाद अजूनही माणसं कवटाळतात या वास्तवाचा वेध ॲडम रुदरफोर्ड प्रस्तुत पुस्तकात घेतात. ” तुम्ही जिथून आला तिथं परत जा…आम्हाला तुम्ही अमेरिकेत नको आहात.. काळे लोक तुम्हाला शेजारी म्हणून हवेत काय.. ज्यू परके आहेत, ते आमची जागा घेऊ पहात आहेत…” असं आता अमेरिकेत जाहीरपणे बोललं जातंय. आफ्रिकन, मुसलमान, भारतीय, आशियन, मेक्सिकन असं एकाद्या समाजाचं वर्णन करून त्या समाजाला अमेरिकेत आता उघडपणे वेगळं करून हाकलून देण्याची…