Browsed by
Category: लेख

मोदींच्या दिल्ली विजयाचा अर्थ

मोदींच्या दिल्ली विजयाचा अर्थ

।। India’s Power elite: Caste, class and cultural                        revolution. Sanjay Baru. || संजय बारू यांच्या प्रस्तुत पुस्तकाचा विषय दिल्लीतल्या  सत्तावर्तुळातली क्रांती असा आहे.  एका वाक्यात सांगायचं तर दिल्लीवरचा एका विशिष्ट संस्कृतीचा ताबा नरेंद्र मोदी दूर करून तिथं एक पर्यायी राजकीय संस्कृती वसवत आहेत, असं संजय बारू यांचं म्हणणं आहे. संजय बारू पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सल्लागार होते. २०१४ पर्यंत दिल्लीतल्या सत्तावर्तुळात इंग्रजीत विचार करणारे, ब्राह्रण (ऊच्च वर्णीय), समाजाच्या वरच्या आर्थिक थरातले, हिंदी पट्ट्यातले,कुलीन (घराण्याची परंपरा असणारे)आणि उद्योगपती  बसले होते. या लोकाना दरबारी लोक…

Read More Read More

एक आशावादी पुस्तक

एक आशावादी पुस्तक

रुटगर ब्रेगमन यांचं Human Kind, A Hopeful History हे पुस्तक सध्या जगभर गाजतंय. ब्रेगमन व्यवसायानं पत्रकार आहेत, अकॅडमिक इतिहासकार नाहीत तरीही या पुस्तकात त्यांनी रेखाटलेला मानवी समाज जगभरच्या अकॅडमिक लोकाना विचार करायला लावत आहे. टेड टॉक, बीबीसी, अनेक युनिव्हर्सिट्या यांत त्यांचा विचार ऐकून घेतला जात आहे. ब्रेगमन यांची पुस्तक लिहिण्याची धाटणी सध्या गाजत असलेल्या युवाल हरारी यांच्या शैलीशी मिळती जुळती आहे. जगभरचे बायॉलॉजिस्ट, आर्किऑलॉजिस्ट, सायकॉलॉजिस्ट इत्यादींचे अभ्यास यांचा आधार ब्रेगमन घेतात. लेखकानं आपली बाजू वाचकांना पटवण्यासाठी किती तरी प्रयोग, किती तरी विचारवंत, किती तरी बातम्या आणि पुस्तक यांचे निष्कर्ष…

Read More Read More

मोदींची चमकोगिरी

मोदींची चमकोगिरी

नरेंद्र मोदी न्यू यॉर्कच्या विमानतळावर उतरले तेव्हां त्यांच्या स्वागताला अमेरिकन सरकारचं किंवा सत्ताधारी डेमॉक्रॅटिक पक्षाचं एकही माणूस नव्हतं. दोन भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं.  प्रेसिडेंट जो बायडन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मोदींचं कोमट स्वागत केलं, त्यात उत्साह नव्हता, मोदींची स्तुती नव्हती. अमेरिका गांधी आणि नेहरूंच्या आदर्शांवर वाटचाल करणार आहे अशी कानपिचकी बायडन यांनी दिली. उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी काढलेल्या पत्रकात मोदींचं स्वागत तर नव्हतंच पण लोकशाही संकटात आहे, लोकशाही बळकट करण्यासाठी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे असे टोमणे होते. या घटनांमधून…

Read More Read More

यशस्वी आणि लोकप्रिय अँजेला मर्केल स्वतःहून सत्तेतून निवृत्त झाल्या.

यशस्वी आणि लोकप्रिय अँजेला मर्केल स्वतःहून सत्तेतून निवृत्त झाल्या.

 अँजेला मर्कल जर्मनीच्या चॅन्सेलरपदावरून निवृत्त झाल्या. त्यांचं बरं चाललं होतं. ७५ टक्के जर्मन जनतेला त्यांचं नेतृत्व पसंत होतं. त्यांच्या कोविड हाताळणीवर ८५ टक्के जनता खुष होती. जर्मनीतच नव्हे तर साऱ्या युरोपातल्या जनतेनं त्यांचं नेतृत्व मान्य केलं होतं. आणखी चारआठ वर्ष जरी त्या सत्तेत रहात्या तरी लोकांना ते हवं होतं. आज तरी त्यांच्यायेवढं समर्थ नेतृत्व युरोपात नाही.    २०१८ सालीच त्यांनी सांगून टाकलं होतं की आत बस झालं, सोळा वर्ष सत्ता उपभोगली, पुरे झालं, आता आपण २०२१ची निवडणुक लढवणार नाही. गंमत पहा….

Read More Read More

रक्त तपासणीची अमेरिकन बनवाबनवी

रक्त तपासणीची अमेरिकन बनवाबनवी

अमेरिकेत एक जाम उदबोधक आणि रंजक नाटक घडतय. हे नाटक म्हणजे कोर्टनाटक आहे. एलिझाबेथ होम्स या महिलेवर लोकांना फसवल्याचा आरोप आहे, आरोप सिद्ध झाला तर होम्सना वीस वर्षाची शिक्षा आणि काही लाख  डॉलर्सचा दंड होऊ शकेल. रक्ताच्या दोन थेंबात दोनशे तपासण्या करणारं यंत्रं आपण तयार करणार आहोत, केलंय, असं एलिझाबेथ खोटंच बोलल्या. तसं यंत्र ना तयार झालं होतं ना तयार होण्यासारखं होतं. रोगी आणि कंपनीत भांडवल गुंतवणारे यांना एलिझाबेथनी थापा मारल्या, फसवलं असा आरोप एलिझाबेथ होम्स यांच्यावर आहे. एलिझाबेथ होम्सनी २००३ साली वयाच्या अवघ्या १९व्या…

Read More Read More

उपासमार आणि दुष्काळ. सत्ताखटपटीचा परिणाम.

उपासमार आणि दुष्काळ. सत्ताखटपटीचा परिणाम.

इथियोपियात आठ प्रांत किंवा राज्यं आहेत. इथियोपियात ओरोमो,अम्हारा,सोमाली,टिग्रे इत्यादी आठ प्रमुख संस्कृती आहेत.प्रत्येक संस्कृतीची एक स्वतंत्र  भाषा आहे, अनेक बोली भाषा आहेत. तीन ख्रिस्ती पंथ, दोन इस्लामी पंथ आणि अनेक स्थानिक उपासनापद्धती आहेत. शेकडो वर्ष अशा अनेक ओळखीचं मिश्रण असलेल्या ओळखी, इथियोपिया या भूप्रदेशात, अनेक राज्यं आणि साम्राज्यांचा भाग म्हणून, एकत्र नांदत आहेत. ।। टिग्रे. इथियोपियातला एक प्रांत, एक राज्य. सध्या तिथं  लाखो मुलं कुपोषित आहेत, लाखो माणसं उपाशी आणि तहानलेली आहेत. त्यांना अन्न, पाणी,औषधं उपलब्ध होत नाहीयेत. वस्तू बाजारातून गायब आहेत,…

Read More Read More

भीषण सत्ताकारण.

भीषण सत्ताकारण.

काबूल विमानतळावर दोन स्फोट झाले. त्यात साठेक माणसं मेली आणि सुमारे दीडशे जखमी झाली. काबूल विमानतळाच्या  आसपास हजारो माणसं देशाबाहेर जाण्याच्या खटपटीत गोळा झाली होती, विमानतळावर  प्रवेश मिळेल, विमानात प्रवेश मिळेल, स्थलांतरीत होता येईल या आशेनं. याच गर्दीत एक अब्दुल नावाचा माणूस होता.  दूरच्या हेलमांड प्रांतातून तो चंबुगवाळं आवरून काबूलमधे पोचला होता. त्याच्याकडं कागदपत्रं होती. गेली आठेक वर्षं तो ब्रिटीश फौजांना मदत करत असे. त्याचं काम असं. दरी,पश्तू भाषेतील कागदपत्रं आणि संभाषणं अनुवादून ब्रिटीश फौजाना, अफगाण सैनिक व पोलिसांना  सांगणं. अब्दुल स्थानिक असल्यानं त्याला…

Read More Read More

अफगाणिस्तान अधांतरी

अफगाणिस्तान अधांतरी

तालिबाननं अफगाणिस्तानची सूत्रं अधिकृतपणे हाती घेतली आहेत. तालिबानच्या प्रवक्त्यांनी, प्रतिनिधींनी, काबूलमधे पत्रकार परिषद घेऊन इस्लामी अमिरात स्थापन झाल्याचं जाहीर केलंय.   पत्रकार परिषदेत अफगाण आणि जगातल्या इतर देशातल्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना तालिबाननं म्हटलंय ते असं :  स्त्रियांना शिक्षण आणि काम करण्याचं स्वातंत्र्य राहील, पत्रकारांना स्वातंत्र्य राहील, विरोधक आणि एनजीओना सूडानं वागवलं जाणार नाही, तरूणांची देशाला गरज आहे त्यांनी देश सोडून न जाता देशाच्या विकासाला हातभार लावावा, दहशतवादी गटाना अफगाणिस्तानात काम करू दिलं जाणार नाही.  अर्थात शरीया आणि इस्लामच्या चौकटीत. शरीयाचा अर्थ तालिबान…

Read More Read More