तालिबानचा ताबा
६५ टक्के अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवला आहे. काबूल, कंदाहार, मझारे शरीफ अशी मोजकी मोठी शहरं फक्त सरकारच्या ताब्यात आहेत. अमेरिकन फौजा माघारी गेल्या आहेत. शहरं ताब्यात ठेवण्यासाठी अमेरिका तालिबानच्या अड्ड्यांवर हल्ले करत आहे. कतारच्या तळावरून आणि अरबी समुद्रातल्या विमानवाहू जहाजांवरून विमानं उड्डाण करतात, अफगाणिस्तानात हल्ले करून परततात. बाँब आणि रॉकेटं टाकू शकणारी हेलीविमानं आणि ड्रोन हे हल्ले करतात. महिना दोन महिन्यात काबूलसह इतर शहरं तालिबानच्या हातात पडतील आणि देशावर ताबा मिळाल्याचं तालिबान जाहीर करेल. तालिबान आणि सरकार यांच्यात युद्ध चाललं असताना…