एका प्रेसिडेंटच्या मुलाची गोष्ट
ब्युटिफुल थिंग्ज ।। अमेरिकन समाजाची एकूण स्थिती आणि तिथलं राजकारण कसं (भयानक?) झालंय याचं प्रत्यंतर अनवधानानं एका ताज्या पुस्तकात घडलंय. काल परवाच प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक म्हणजे अमेरिकेचे प्रेसिडेंट जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन याच्या आठवणी. किंवा असंही म्हणावं की हे पुस्तक म्हणजे हंटर यांची कबुली आहे. पुस्तकाचं नाव आहे ब्युटिफुल थिंग्ज. हंटरचा अत्यंत प्रिय भाऊ बो यानं मरण्याच्या आधी अत्यंत व्याकुळ क्षणी घराच्या व्हरांड्यातून बाहेरचं निसर्ग सौंदर्य हंटरला दाखवलं आणि ब्युटिफूल येवढाच शब्द उच्चारला. त्यावरून हंटरनं हे शीर्षक…