ऑस्करसाठी नोमॅडलँड. न दिसणारी अमेरिका.
नोमॅडलँड. कलाकार वास्तवापासून दूर राहू शकत नाही. वास्तव कितीही दाहक असो. कवी असो, कादंबरीकार असो,चित्रकार असो की चित्रपट करणारा. कोण काय म्हणेल याचा विचार न करता कलाकार वास्तव चितारतो. वास्तव चितारण्याची पद्धत, व्यक्त होण्याची कलाकाराची पद्धत मात्र वेगळी असते.वास्तव थेट असतं पण त्यावर भाषणं वगैरे कलाकार झोडत नाही. रसिकानं कला अनुभवायची, त्याचा आस्वाद आपापल्या पद्धतीनं घ्यायचा. मांडण्याची मोकळीक कलाकाराला आणि पहाण्याची मोकळीक रसिकाला. संदर्भ आहे नोमॅडलँड या चित्रपटाचा. जेसिका ब्रुडर यांच्या याच नावाच्या एका पुस्तकावर सिनेमा आधारलेला आहे. फर्न ही…