झटपट व्हिस्की
झटपट व्हिस्की आता झटपट व्हिस्क्या बाजारात येत आहेत. काही तासात व्हिस्की तयार होईल आणि बाटलीबंद होऊन ग्लासांपर्यंत पोचेल. साधारण व्हिस्की तयार व्हायला तीन वर्षं लागतात. जातीवंत व्हिस्की पंधरा ते सत्तर वर्षात तयार होते. ओक वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेल्या पिंपात व्हिस्की साठवली जाते. लाकूड आणि व्हिस्की यांच्यात वेगवेगळ्या तापमानात रासायनीक घटकांची देवाण घेवाण होते. व्हिस्की लाकडात जाते, लाकूड व्हिस्कीत जातं. फार सावकाशीनं ही प्रक्रिया पार पडते.अनेक उन्हाळे आणि हिवाळे ही व्हिस्की पहाते. व्हिस्की फर्मेंट करण्यासाठी जे पाणी वापरलं जातं त्या पाण्यालाही…