मुख्यमंत्रीपद हुकलं
फडणवीस दोनेक तास वर्षाच्या हिरवळीवर येरझारा घालत होते. थांबेचनात. त्यांच्या पुढं मागं करणारे कमांडोही दमले. जेवायची वेळ टळून गेली म्हणून अमृता वहिनी देवेंद्रना शोधत होत्या तर त्यांना देवेंद्र हिरवळीवर फेऱ्या मारताना दिसले. अमृतावहिनीही देवेंद्रांबरोबर फेऱ्या मारू लागल्या. “ आता थांबा, जेवून घ्या, पोट कमी करण्यासाठी इतका अघोरी उपाय करणं बरोबर नाही.” देवेंद्र ऐकायला तयार नाहीत. वहिनींबरोबर साताठ फेऱ्या झाल्या. वहिनी जायला तयार नाहीत म्हटल्यावर धापा टाकत देवेंद्र म्हणाले, “ तुला समजत कसं नाहीये. तिकडं शरद पवारांनी कट रचलाय. ते उद्धव…