ट्रंप मोदी रिअॅलिटी शो
डोनल्ड ट्रंप यांना निवडून येण्यासाठी भारतीय मतांची आवश्यकता आहे. ३०४ इलेक्टोरल मत देणारं टेक्सर राज्य पदरात पाडणं ट्रंपना आवश्यक आहे. टेक्ससमधे २.७ लाख भारतीय मतं आपल्या खिशात पडावीत यासाठीच ट्रंपनी तिथं हावडी मोदी कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाचा उत्तरार्ध अमदाबादेत नमस्ते ट्रंप या कार्यक्रमानं घडवून आणला. ट्रंप भारतात येऊन गेले. भारतात येण्यापूर्वी भारतीय माणसांना अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी आवश्यक व्हिसा तरतुदी त्यानी कडक करून भारतीयांना नाराज केलं. त्या तरतुदी सैल केल्याची घोषणा त्यांनी केली नाही. भारतीय मालावर त्यानी लावलेल्या जकाती…