मुत्सद्दी मांजर
परवाच्या दिवशी प्रधान मंत्री कीर स्टार्मर प्रेसिडेंट झेलेन्सकी यांच्याबरोबर चर्चा करत होते. पुतीन थांबायला तयार नाही, युरोपीय मदत कासवाच्या गतीनं येतेय, ट्रंप तात्यांचा काही अंदाजच लागत नाही. झेलेन्सकी असं काही तरी म्हणत होते. ट्रंप तात्यांचं खरं नाही हेच खरं. मला म्हणतायत की होरमुझच्या सामुद्रधुनीत तुझी लढाऊ जहाजं पाठव. मी त्याला सांगितलं की मला आमच्या पार्लमेंटला विचारावं लागेल, लोक काय म्हणतात ते पहावं लागेल, मंत्रीमंडळात ठराव घ्यावा लागेल. तर ट्रंप माझंच माप काढतो, म्हणतो की मी म्हणे चर्चील नाहीये. मी चर्चील कसा…