जफर पनाही
सिनेमा. जफर पनाही. ‘इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट’ रहस्य, ह्यूमर. जफर पनाही या इराणी चित्रपट दिक्दर्शकाची ताजी बातमी; त्याला इराणच्या पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकलंय. कारण. जनतेच्या महागाई विरोधी, सरकार विरोधी आंदोलनात इराणी सरकारनं हजारो निरपराध माणसांना ठार मारलं याचा निषेध जफर पनाही यांनी केला. पत्रकात पनाही म्हणाले की धर्मनेते यांनी हजारो माणसं मारली. पनाही यांची ही तिसरी अटक आहे. या आधी दोन वेळा ते तुरुंगात होते; एकदा सहा वर्षासाठी. पनाहींचे चित्रपट वास्तवाचं रूपांतर कलेत करतात. गेल्या वेळी सहा…