इराणमधली अस्वस्थता
तेहरानमधील (इराणची राजधानी) चार विद्यापीठातले विद्यार्थी देशातल्या आर्थिक परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले. इराणभरच्या विद्यार्थ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. तेहरान,इशफाहान या शहरातले व्यापारी दुकानं बंद करून रस्त्यावर उतरले. वाढलेली महागाई असह्य झालीय असं एकूण लोकांचं मत दिसतंय. मध्यम वर्गीय आणि गरीब इराणींच्या मुलाखती प्रसिद्ध होत आहेत. गेल्या वर्षभरातल्या महागाईत प्रथम चैनीच्या वस्तू खरेदी करणं बंद केलं, नंतर कपडे विकत घेणं थांबवलं, मग घराची भाडी थकवली, चटकदार खाणं संपवलं, आता दैनंदिन उपयोगाच्या वस्तूही विकत घेणं बंद करायचं काय असा प्रश्न लोक…