मद्य मधे मधे
व्हिस्की व्हिस्की बायबल नावाच्या एका नियतकालिकानं स्कॉटलंडमधे तयार होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीला दर्जेदार व्हिस्कीच्या क्रमवारीत खाली ढकललं आहे. व्हिस्की बायबल नावाचं एक गाईड निघतं. बायबल या धर्मग्रंथाच्या नावाचा वापर ब्रँडसाठी करणं, आपल्या गाईडच्या प्रचार-प्रसारासाठी करणं हा प्रकार पश्चिमेतलेच लोक करू जाणोत. भारतात असं काही करून पहावं आणि त्याची काय प्रतिक्रिया येईल याची कल्पना करावी. असो. तर २००३ पासून हे गाईड प्रसिद्ध होतं. जगभरच्या व्हिस्क्यांचा अभ्यास या गाईडमधले जाणकार करतात. नंतर त्यांच्या ज्या काही कसोट्या असतात त्यानुसार ते व्हिस्कीला क्रमांक देतात. पहिला …