कोविड आणि राजकारण
Doom: The Politics of Catastrophe Niall Ferguson ।। नियाल फर्ग्युसन यांचं डूम, पॉलिटिक्स ऑफ कॅटॅस्ट्रॉफी, हे पुस्तक कोविड आणि राजकारण या विषयावर आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक माणूस गोल्फ खेळताना दिसतो, पार्श्वभूमीवर भीषण आग दिसते. गोल्फ खेळणारा माणूस म्हटलं की अलीकडं डोनल्ड ट्रंप यांची छबी डोळ्यासमोर येते. कोविडचं संकट दररोज हजारो माणसांना मारत होतं तेव्हां खरोखरच ट्रंप गोल्फ खेळत असत. रोम जळत असताना नीरो फीडल वाजवत होता असं म्हणतात तसंच हे गोल्फ. भीषण समस्या राजकारणी लोकांना सोडवता आली नाही, ते आपल्याच…