अफगाणिस्तानात तालिबानची अनिर्बंध सत्ता
येत्या ११ सप्टेंबरला अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्षं पूर्ण होतील. तो मुहूर्त साधून अमेरिकेनं अफगाणिस्तानातले उरले सुरले २४०० सैनिक माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तालिबानच्या मागणीवरून घेण्यात आलेला आहे, तालिबानच्या हातात सत्ता सोपवायला या निर्णयान अमेरिकेनं मान्यता दिली आहे. नेटो संघटनेचे सुमारे ७ हजार सैनिक अफगाणिस्तानात शिल्लक रहातातच. तेही बहुदा त्यांच्या त्यांच्या देशात परततील. ही घटना आशियातल्या राजकारणावर दूरगामी परिणाम घडवून आणणार आहे. अफगाणिस्तानात पुन्हा अराजक माजेल; पाकिस्तान, चीन, रशिया इत्यादी देश पुन्हा अफगाणिस्तानात आपापले अड्डे जमवतील अशी दाट शक्यता दिसते…