“सांस्कृतीक” क्रौर्य
यांग जिशेंग यांच्या World Turned Upside Down या नव्या पुस्तकाची दखल पश्चिमी देशातली माध्यमं सध्या घेत आहेत. या पुस्तकात लेखकानं माओच्या १९६६ ते १९७६ च्या दरम्यान झालेल्या सांस्कृतीक क्रांतीवर सविस्तर लिहिलं आहे. माओच्या राजकीय जीवनात तीन मोठी पर्वं झाली. पहिलं पर्व लाँग मार्च. या काळात माओनं कम्युनिष्ट पार्टी चीनमधे रुजवली आणि यथावकाश माओ सत्ताधारी झाला. दुसरं पर्व आकाशउडीचं, झटपट आर्थिक विकासाचा प्रयत्न. माओचं डोकं अजबच म्हणायचं. चिनी समाज माओला पूर्ण बदलायचा होता. बदल चुटकीसरशी होऊ शकतात असं माओला वाटत असावं. त्यामुळं दुसऱ्या पर्वात माओनं…