लढाया, दंगली,हिंसाचार कव्हर करणाऱ्या महिला बातमीदार.
Our Women on the Ground या नावाचं पुस्तक पेंग्वीन प्रकाशनानं अशात प्रसिद्ध केलंय. इराक, सीरिया, लेबनॉन, जॉर्डन, तुर्की, सौदी इत्यादी अरब प्रदेशात जीव पणाला लावून पत्रकारी करणाऱ्या १९ अरब पत्रकार महिलांचे अनुभव, निबंध या पुस्तकात आहेत. आपला अनुभव असा की प्रत्येक युद्धाच्या वेळी पत्रकार रकाने भरभरून युद्धाचा उन्माद निर्माण करतात. युद्धात माणसं मरतात हे भीषण वास्तव पत्रकार रम्य आणि उदात्त करून टाकतात. माणूस मेल्यावर स्वर्गात जातो, तो हुतात्मा होतो वगैरे गोष्टी युद्धात भाग न घेणाऱ्या लोकांना बोलायला सोप्या असतात….