अर्थव्यवस्था खड्ड्यात घालणारी चलाखी
कोविडनं निर्माण केलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी सरकारनं छोट्या उद्योगांना ३ लाख कोटींचं कर्ज देऊ केलं आहे. हे कर्ज कमी व्याजाचं असेल.कल्पना अशी की हे पैसे बंद पडलेल्या उद्योगांनी आपल्या कर्मचाऱ्यांना देऊन व इतर देणी भागवून व कच्चा माल इत्यादीत गुंतवून पुन्हा उद्योग सुरु करावेत. चौकशी केल्यानंतर जे समजतं ते विचित्र आहे. बँकांनी वरील पैसा उद्योगांना दिला खरा पण त्यांच्यापैकी बहुतांश लोकांनी तो पैसा आपली जास्त व्याजाची कर्जं फेडण्यासाठी वापरला, उद्योग सुरु करण्यासाठी नाही. म्हणजे सरकारनं जुनं नवं केलं. सहकारी…