अमेरिकन स्प्रिंग
अमेरिकन स्प्रिंग अमेरिकेतला असंतोष थंड व्हायला तयार नाही. अमेरिकेतल्या ७३ टक्के गोऱ्या नागरीकांना अमेरिकेत वर्णद्वेष आहे हे मान्य आहे. सॉल्ट लेक सिटी मधे काळे फक्त दोन टक्के आहेत, तरीही तिथं गोरी माणसं सतत निदर्शनं करून ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीला पाठिंबा देत आहेत. १९६६-६८ साली कर्नर कमीशननं म्हटलं होतं “आपला देश दुभंगतोय,दोन विभक्त समाज निर्माण होऊ घातलेत, एक काळा एक गोरा, असमान आणि विभक्त. ” निक्सन यांच्या काळात सुरु झालेली ही प्रक्रिया ट्रंप यांच्या काळात जवळपास पूर्णत्वाला गेली. अमेरिकेत १७…