मोदींच्या जाकिटाचं बटण तुटतं तेव्हां…
लोककल्याण मार्गावरच्या सात नंबरच्या बंगल्यातल्या कार्यालयात नरेंद्र मोदी बसले होते. समोर चार अधिकारी फायली घेऊन उभे होते. खूप अंतरावर. दूरदर्शनची माणसं मोदींचं भाषण रेकॉर्ड करण्याची तयारी करत होते. कॅमेरा सेट झाला होता. दूरदर्शनचा अधिकारी आणि रेकॉर्डिंग करणारे कर्मचारी कुजबुजत होते, सारं काही ठीक आहे ना याची तपासणी करत होते. मोदी सरांनी मान्यता दिली की रेकॉर्डिंग सुरु व्हायचं होतं. स्क्रिप्ट तयार झालं होतं. मोदी लॉक डाऊन १४ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करणार होते. अर्थात हे फक्त स्क्रिप्ट तयार करणाऱ्या…