बस, सत्ता हवीय.

बस, सत्ता हवीय.

 सत्तेची इतकी हाव? भाजप आणि शिवसेनेनं २०१९ च्या निवडणुका युती करून लढवल्या. भाजपला १०५ जागा आणि सेनेला ५६ जागा मिळाल्या. २८८ जागांच्या विधानसभेत १४५ जागा मिळाल्या की सरकार तयार करता येतं, भाजप-सेना युतीला १६१ जागा मिळाल्या. २४ ऑक्टोबर रोजी निकाल लागले तरीही ८ नोव्हेंबरपर्यंत भाजप-सेनेला सरकार स्थापन करता आलं नाही. भाजप आणि सेनेत धोरण आणि कार्यक्रमाबाबत मतभेद नाहीत. दोन्ही पक्षांची युती २५ वर्षापेक्षा अधिक काळ आहे, दोन वेळा त्यांनी एकत्रितपणे सरकार चालवलं आहे. तरीही सरकार होत नाहीये. कारण काय? मतभेद…

Read More Read More

दिवाळी अंकांतली चार मोठी माणसं.

दिवाळी अंकांतली चार मोठी माणसं.

यंदाच्या दिवाळी अंकात माणसाला समृद्ध करणाऱ्या चार माणसांची प्रोफाईल्स आहेत. परिवर्तनाचा वाटसरू या अंकात नोम चॉम्सकी आहेत. चॉम्सकीनी आता नव्वदीत प्रवेश केला आहे.  त्यांनी भाषा या विषयावर संशोधन केलं आहे. भाषा आत्मसात करण्याची क्षमता माणसाच्या मेंदूत जन्मतः असते, मूल परिसरातून मिळणाऱ्या अनुभवातून भाषेचं सोयिस्कर व्याकरण शिकतं, जीवसृष्टीत माणूस या एकाच जीवाकडं भाषा नावाची गोष्ट आहे, हा चॉम्सकी यांचा सिद्धांत. हा सिद्धांत त्यांनी राजकारणात सर्व माणसं मूलतः सारखीच असतात हे सांगण्यासाठीही वापरला. चॉम्सकी गाजले आणि आजही चर्चेत असतात ते त्यांच्या राजकीय…

Read More Read More

डफ्लो-बॅनर्जी, नोबेल विजेता सिद्धांत

डफ्लो-बॅनर्जी, नोबेल विजेता सिद्धांत

जगभर अजूनही अब्जावधी माणसं गरीब आहेत, अशिक्षित आहेत, योग्य आरोग्यापासून वंचित आहेत. जगभरची सरकारं गरीबी आणि त्यातून उद्भवलेले त्रास नष्ट करण्यासाठी अब्जावधी खर्च करत आहेत. ।। एस्थर डफ्लो आणि अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर भारतात प्रतिक्रियांच्या लाटा आल्या. डावे आणि उजवे, सेक्युलर आणि देवपरमार्थवादी, अशा दोन्ही गटातल्या लोकांनी डफ्लो-बॅनर्जीवर झोड उठवली. तिकडं बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात स्वतंत्रपणे एक चर्चाभेट झाली. डफ्लो आणि बॅनर्जी यांच्यावर  झालेली टीका अनाठायी आणि अज्ञानमूलक आहे.  डफ्लो आणि बॅनर्जी यांनी  गरीबी निर्मूलन या…

Read More Read More

लोकांना नकोसं वाटणारं सत्य सांगणारा पत्रकार. सिमोर हर्श.

लोकांना नकोसं वाटणारं सत्य सांगणारा पत्रकार. सिमोर हर्श.

पत्रकाराचं काम असतं ” महत्वाचं आणि लोकांना नकोसं वाटणारं सत्य सांगून देश अधिक ज्ञानी करणं. “  हे अवतरण आहे सिमोर हर्श यांच्या Reporter:A Memoir या आठवणींच्या पुस्तकातलं. अमेरिका या देशाच्या सरकारनं आणि लष्करानं वियेतनाम या देशावर विनाकारण आक्रमण केलं.  लाखो वियेतनामींना विनाकारण मारलं. विषारी औषधं फवारून वियेतनाममधली लाखो एकर शेती आणि पिकं नष्ट केली. निष्पाप मुलकी वस्त्यांवर बाँब टाकून हज्जारो माणसं, बायकामुलंवयस्कं मारले. हे सारं लोकांपासून लपवून ठेवलं. माध्यमांमधे खोटा प्रचार केला, थापा मारल्या, जुमले पेरले. माध्यमांवर दबाव आणला आणि…

Read More Read More

पंतप्रधान तुरुंगाच्या वाटेवर…

पंतप्रधान तुरुंगाच्या वाटेवर…

भारताचे विद्यमान परदेशी मित्र एका मागोमाग एक न्यायालयं आणि चौकशीच्या फेऱ्यात सापडत आहेत.  ट्रंप त्या वाटेवरचे आगेवान. आगेवान हा शब्द गुजराती भाषेतला. पुढे चालणारा, आघाडीवर असणारा तो आगेवान. ट्रंप यांच्या कोटाचा मागचा भाग धरून नेतान्याहूंची जोरदार वाटचाल चाललीय. इस्रायलचे अॅटर्नी जनरल अविचाई मँडलब्लिट यांनी नेतान्याहू यांच्या विरोधातला भ्रष्टाचाराचा लोंबत पडलेला खटला चालवायला घेतला आहे. नेतान्याहू यांच्यावर एक आरोप आहे तो हॉलीवूड मोगल अरनॉन मिलचन यांना अधिक काळ इस्रायलमधे रहाता यावं यासाठी इस्रायलचा व्हिसा  वाढवून देण्यासाठी अमेरिकन सरकारवर दबाव आणणं. तशी…

Read More Read More

कायदा, सभ्यता, सदाचार न पाळणारा देशप्रमुख

कायदा, सभ्यता, सदाचार न पाळणारा देशप्रमुख

कायदा, सभ्यता, सदाचार न पाळणारा देशप्रमुख. ।। ट्रंप यांनी युक्रेनच्या अध्यक्षांना फोन केला. त्यांना विनंती केली की जो बायडन यांचा मुलगा युक्रेनमधे सक्रीय असणाऱ्या एका कंपनीत संचालक होता हे प्रकरण उकरून काढा, त्याची माहिती मला द्या. त्या बाबत जुलियानी हे माझे वकील आणि अटर्नी जनरल बार  तुमच्याशी संपर्क साधतील. ही विनंती करण्याच्या आधी अमेरिकेनं देऊ केलेली ४० कोटी डॉलरची मदत अमेरिकेनं रोखून ठेवली होती, ती पुन्हा सुरु केली. जो बायडन हे ट्रंप यांचे येत्या निवडणुकीतले संभाव्य प्रतिस्पर्धी आहेत, ओबामा यांच्या…

Read More Read More

लोकशाहीचं मातेरं

लोकशाहीचं मातेरं

ब्रिटीश संसद दीर्घ काळ बरखास्त करण्याचा बोरिस जॉन्सन यांचा  निर्णय ब्रीटनच्या सर्वोच्च न्यायालयानं बेकायदेशीर, निराधार, अनावश्यक ठरवून रद्द केला.    संसदेचं कामकाज किती दिवस चालवायचं, केव्हां स्थगित करायचं, संसद बरखास्त करून निवडणुका केव्हा घ्यायचा हे निर्णय सरकारचा अधिकार असतो. राणीनं शिक्का मोर्तब केल्यानंतर तो निर्णय अमलात येत असतो. प्रधान मंत्री राणीला (किंवा राजाला-मोनार्क) सल्ला देतो. राणीला ब्रिटीश परंपरांचे जाणकार, प्रीवीकाऊन्सीलचे सदस्य सल्ला देतात.  राणीच्या संमतीनं निर्णय घेण्याची प्रथा ब्रिटीश लोकशाहीत आहे. राणीला सल्ला मान्य नसेल तर  राणी खाजगीत चर्चा करते,…

Read More Read More

शेतकरी आत्महत्या थांबण्याची शक्यता कितपत?

शेतकरी आत्महत्या थांबण्याची शक्यता कितपत?

    २०१८ साली महाराष्ट्रात २७६१ शेतकऱ्यांनी अकाली मरण पत्करलं, भारतात  सुमारे १३ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.   भारतात १२.५६ कोटी मध्यम व छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडं सरासरी जास्तीत जास्त जमीन दोन हेक्टर आहे. बहुतेक शेतकरी भुसार पिकं काढतात, कोरडवाहू शेती करतात. सरासरी शेतकऱ्याचा उत्पादन खर्च (दोन हेक्टरसाठी) १० हजार रुपये होतो. त्याचं सरासरी उत्पन्न २०,४०० रुपये होतं. म्हणजे वर्षाकाठी त्याला सुमारे १० हजार रुपये खर्चायला मिळतात. त्यामधे त्यानं शिक्षण, आरोग्य, लग्न, सण, करमणुक इत्यादी गोष्टी सांभाळायच्या. मशागत, पेरणी, कापणी,…

Read More Read More

ट्रंप यांचा ट्वीटखेळ

ट्रंप यांचा ट्वीटखेळ

आठ सप्टेंबरच्या पहाटे सव्वाचार वाजता प्रेसिडेंट ट्रंपनी ट्वीट करून जाहीर केलं की आपण कँप डेविड (अमेरिका) येथे होणारी तालिबान पुढाऱ्यांबरोबरची बैठक रद्द केलीय. ट्रंपनी म्हणे तालिबानच्या पुढाऱ्यांना कँप डेविडमधे बोलावून घेतलं होतं. ट्रंप यांचं ट्वीट प्रसारित झालं तेव्हां अमेरिका झोपेत होती, व्हाईट हाऊस, पेंटॅगॉन, सुरक्षा सल्लागार, सीआयएचे लोक इत्यादी सगळी जनता झोपेत होती. जाग आल्यावर त्यांना कळलं की ट्रंप तालिबानच्या पुढाऱ्यांबरोबर एक बैठक करणार होते. अमेरिकन सरकार, अमेरिकन लष्कर, अमेरिकन परदेश खातं अशा सगळ्याच ठिकाणची माणसं ट्रंप यांच्या ट्वीटनं बुचकळ्यात…

Read More Read More

गंभीर आर्थिक संकट

गंभीर आर्थिक संकट

जुलै २०१९ मधे केंद्र सरकारनं बजेट मांडलं. मांडत असताना आणि मांडून झाल्यावर स्पष्ट झालं की सरकारला करांतून अपेक्षित असलेला १९.७८ लाख कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला नाहीये. जमा झाले होते १५.९ लाख कोटी रुपये. सरकारला मिळणाऱ्या महसुली उत्पन्नात जीएसटी हा एक महत्वाचा घटक असतो. जुलै महिन्यांपर्यंत जीएसटीतून  अपेक्षेपेक्षा ४० हजार कोटी रुपये कमी मिळाले. महसूल कमी म्हणजे मोठीच अडचण. खर्च कुठून करायचा? तूट कशी कमी करायची? पैसे कुठून आणायचे? फेब्रुवारीत संकटाची चाहूल लागल्यावर सरकारनं  २८ हजार कोटी रीझर्व बँकेकडून घेतले….

Read More Read More