जेटलींचं मरण आणि राम सेतू

जेटलींचं मरण आणि राम सेतू

केंद्रीय विकास मंत्री निशांक यांनी खरगपूरच्या आयआयटीतल्या इंजिनयरिंग विद्यार्थ्यांना राम सेतू या विषयावर संशोधन करण्याचा सल्ला दिला. राम सेतू असं नाव दिलेली दगडांची रांग भारत आणि लंका यांच्यामधल्या समुद्रात आहे. निशांक ज्या दगडांच्या रांगेचा उल्लेख करतात त्यालाच राम सेतू हे नाव अगदीच अलीकडं देण्यात आलंय. त्या आधी ती रांग अॅडमचा पूल म्हणून ओळखली जात होती. ख्रिस्ती समजुतीनुसार अॅडम शिक्षा झाल्यावर पृथ्वीवर पडला तो या पुलाच्या जागी असं काहींचं म्हणणं.   लंका मुळात कुठं होती यावर अनेक मतं आहे. मालदीव बेटं…

Read More Read More

देश विकत घ्यायला निघालेला प्रेसिडेंट

देश विकत घ्यायला निघालेला प्रेसिडेंट

ग्रीनलँड हा डेन्मार्कचा एक स्वायत्त प्रदेश विकत हवाय, विकता काय, असा प्रश्न डोनल्ड ट्रंपनी डेन्मार्कच्या पंतप्रधानाला विचारला.  काश्मिर किंवा महाराष्ट्र किंवा गुजरात हा प्रदेश विकत घ्यायचा आहे अशी ऑफर भारतीय पंतप्रधानाला देण्यासारखा हा प्रकार. हा प्रश्नही केव्हां काढला? जेव्हां ट्रंप यांचा अनेक महिन्यापासून ठरलेला डेन्मार्कचा दौरा काही दिवसांवर आला होता. डेन्मार्क आणि अमेरिकेचे संबंध चांगले, मैत्रीचे आणि सहकार्याचे आहेत. ते संबंध बळकट करण्यासाठी वरील दौरा आखण्यात आला होता. अमेरिकन अध्यक्षाचा दौरा हे फार कटकटीचं प्रकरण असतं. त्यांच्या सुरक्षेची फार कडेकोट…

Read More Read More

स्वातंत्र्याची विरूप व्याख्या

स्वातंत्र्याची विरूप व्याख्या

रशियामधे, मॉस्कोमधे, साठेक हजार नागरिकांनी निदर्शनं केली. पोलिसांना त्यांना बदडलं. सुमारे १५०० निदर्शकांना तुरुंगात डांबलं. मॉस्कोमधे आणि रशियात निदर्शनं करायची असतील, मोर्चे काढायचे असतील तर सरकारची परवानगी घ्यावी लागते, मंजुरी घ्यावी लागते. वरील निदर्शनांना मंजुरी नव्हती असं रशियन सरकारचं म्हणणं आहे. मॉस्कोमधे झालेली निदर्शनं ही एकटीदुकटी घटना नव्हती.  रशियात आणखी डझनभर ठिकाणी तरी नागरिकांनी आपला असंतोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि सरकारनं तो दडपला. मॉस्कोमधल्या निदर्शकांची मागणी होती की होऊ घातलेल्या मॉस्को पालिकेच्या / विधानसभेच्या निवडणुकीत  स्वतंत्र उमेदवारांना उभं रहाण्याची…

Read More Read More

काश्मिर. उघड्यापाशी नागडं गेलं….

काश्मिर. उघड्यापाशी नागडं गेलं….

 फाळणी झाली तेव्हां काश्मिरची भारतातला काश्मिर आणि पाकिस्तानातला काश्मिर अशी अनौपचारीक विभागणी झाली. अख्खा काश्मिर कोणाचा हा प्रश्न वादाचा झाला, युनोत पोचला, लोंबकळू लागला. या स्थितीत काश्मिरातल्या गोंधळलेल्या जनतेला दिलासा मिळावा म्हणून विशेष दर्जा दिला गेला.   ।। काश्मिरला आता कोणतेही विशेष अधिकार शिल्लक राहिलेले नाहीत. भारतातल्या कोणत्याही राज्यासारखं ते एक राज्य झालंय. राज्य म्हटल्यावर  अधिकार आणि कारभाराचं स्वातंत्र्य मिळतं ते मात्र इथून पुढं जम्मू, काश्मीर आणि लदाखला मिळणार नाही. काश्मिर आता केंद्रशासित प्रदेश होणार आहे, त्यावर केंद्र सरकारचं नियंत्रण…

Read More Read More

लोकशाह्या कशा मरतात

लोकशाह्या कशा मरतात

डोनल्ड ट्रंप अमेरिकेचे प्रेसिडेंट झाले. प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना ट्रंप यांच्यापेक्षा २५ लाख मतं जास्त मिळाली होती. म्हणजे ट्रंप यांच्यापेक्षा किती तरी जास्त लोकांनी क्लिंटनना अध्यक्ष ठरवलं होतं. असं काही तरी होईल याची ट्रंप यांना जवळजवळ खात्रीच होती. त्यामुळं ते प्रचार मोहिमेतच सांगून बसले होते की  निकाल त्यांच्या विरोधात लागला तर तो ते निकाल मान्य करणार नाहीत. एलेक्टोरल कॉलेजच्या निवड पद्धतीमुळंच ट्रंप प्रेसिडेंट झाले, ट्रंपनाही आपण निवडून आलो याचं आश्चर्य वाटलं होतं. ट्रंप यांना प्रेसिडेंट होऊन अमेरिकेचं कल्याण करायचंच नव्हतं….

Read More Read More

राजा आपला वारस नेमतोे

राजा आपला वारस नेमतोे

पुस्तकातून पुस्तकं म्हणजे दीर्घकाळ किवा कायम टिकणारा मजकूर, कापुरासारखा पटकन उडून जाणारा मजकूर नव्हे. पुस्तकात खूप म्हणजे खूपच रंजक आणि उदबोधक मजकूर असतो. ।।  अमेरिकन मुत्सद्दी बर्न्स यांनी लिहिलेल्या आठवणींचं पुस्तक. ।। जॉर्डनचे राजे हुसेन यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला जॉर्डनचा राजा झाला.  राजाचा मृत्यू होतो. राजाचा मुलगा राजा होतो.  किती साधी आणि साहजीक घटना वाटते ना?  पण तसं नसतं. या घटनेला कितीतरी कंगोरे असतात. जॉर्डनचे राजे हुसेन १९९८ साली अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत होते. त्यांच्या अनुपस्थितीत क्राऊन…

Read More Read More

चित्रपट, राजकारण.

चित्रपट, राजकारण.

   सध्या अमेरिकेत चर्चेत असलेला ” अनप्लॅन्ड ” (Unplanned) हा चित्रपट हे गंभीर प्रश्नाचं राजकारण कसं केलं केलं जातं याचं एक उदाहरण आहे.  चित्रपटाचा विषय आहे गर्भपात. या सिनेमाचा प्रचार अमेरिकेचे उप राष्ट्रपती माईक पेन्स करत आहेत. ट्रंप समर्थक आणि चर्चशी संबंधित संघटना या चित्रपटाचा प्रचार करत आहेत. चित्रपटाच्या खेळाची सर्व तिकीटं खरेदी करून ती लोकांना फुकट वाटली जाताहेत आणि तिकीटं देताना हा चित्रपट पहावाच असा आग्रह धरला जातोय. म्हणजे चित्रपटाचं राजकीय मार्केटिंग चाललंय. किंवा उलटंही म्हणता येईल मतं मिळवण्यासाठी…

Read More Read More

सरकारातले पक्ष बदलत रहाणं आणि देशाचे प्रश्न सुटणं यात संबंध नाही

सरकारातले पक्ष बदलत रहाणं आणि देशाचे प्रश्न सुटणं यात संबंध नाही

जून महिन्यातलं चेन्नई. विभाग मायलाई.  सकाळची वेळ. शरदकुमार, त्याची पत्नी गीता आणि त्यांच्या तीन मुली हातात प्लास्टिकच्या घागरी घेऊन गर्दीत उभ्या आहेत. धक्काबुक्की चाललीय, पाण्याच्या टँकरपर्यंत पोचण्यासाठी. तासभर झाला. दोन मुली शाळकरी आहेत. त्या कुरकूर करत आहेत. ” आठवडाभर शाळेला उशीर होतो. बाई ओरडतात. पहिला तास बुडतो.”  शरदकुमारच्या एका हातात घागर, दुसऱ्या हातात सेल फोन. फोन वाजतो.  ऑफिसमधून फोन.  ” दररोज उशीरा येतोयस, आज तरी लवकर ये “ ” काय करू? ऑफिसमधे येण्याआधी आंघोळ आणि कशीबशी पुजा तरी व्हायला हवी…

Read More Read More

पत्रकार असाही असतो

पत्रकार असाही असतो

उंदीर हा एकाद्या दीर्घ लेखाचा विषय होऊ शकतो?  जोसेफ मिचेल नावाचा पत्रकार ते करू शकतो. मिचेलनं १९४४ साली न्यू यॉर्कर या प्रसिद्ध साप्ताहिकात किनाऱ्यावरचे ( न्यू यॉर्कच्या किनाऱ्यावरचे) उंदीर या विषयावर १८ हजार शब्दांचा लेख लिहिला. १९३८ ते १९६४ म्हणजे २८ वर्षं मिचेलनं न्यू यॉर्क शहर याच विषयावर लेखन केलं.  न्यू यॉर्कभर उंदीर पसरलेत. ते कुठं नाहीत असं नाही. कचरापट्टी, पडीक इमारती, धान्य आणि मांसाची मंडी यात तर ते सापडणारच पण न्यू यॉर्कमधल्या चांगल्या हॉटेलांतही असतात. ते भुयारं खणून रहातात….

Read More Read More

हाँगकाँगला लोकशाही हवीय

हाँगकाँगला लोकशाही हवीय

हाँगकाँगला लोकशाही हवीय केवळ नागरी स्वातंत्र्य नव्हे आम्हाला लोकशाही हवीय असं म्हणत हाँगकाँगचे २० लाख नागरीक १२ जूनला रस्त्यावर उतरले. चिनी संस्कृतीची गंमत. चीनच्या पेपरांतून, कम्युनिष्ट पक्षाच्या पेपरांतून, हाँगकाँगचं वर्णन सहोदर असं केलं जातं. सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटातून जन्मलेली मुलं. चिनी सोशल मिडियात आणि पेपरांत लोकांनी कळकळून लेख लिहिले. कर्तृत्ववान आईनं जन्म दिलेलं हाँगकाँग हे मूल काही काळ ब्रिटीशांनी दत्तक घेतलं होतं. ते आता आईकडं परत आलंय. पण मधल्या काळात ते बिघडलं. आता आईकडं परत आल्यावर मुलानं आईचं म्हणणं…

Read More Read More