मंत्रीमंडळ विस्तार. प्रश्न गुळाचा आहे.
महाराष्ट्रात पुढल्या निवडणुकीची तयारी सुरु झालीय. सत्ता हा गूळ आहे. तो गूळ मिळवणं हे निवडणुकीचं मुख्य उद्दीष्ट आहे. गुळाभोवती मुंगळे गोळा होत आहेत. विद्यमान सरकारचे फक्त तीनेक महिनेच उरले आहेत. निवडणूक जाहीर झाली की एक तथाकथित आचार संहिता लागू होईल. म्हणजे असं की मंत्र्यांना सरकारबाह्य अनधिकृत उद्योग करायची मोकळीक राहील. पैसे गोळा करणं, वाटत फिरणं, गावोगाव विरोधात जाणाऱ्यांची नसबंदी करणं, गळ टाकत गावोगावच्या डबक्यांत फिरणं इत्यादी. त्यासाठीच मंत्रीमंडळात जास्तीत जास्त मंत्री गोळा झालेले बरे. हे निवडणुकीचं आधुनिक शास्त्र आहे. हे…