अरे बाबा, राफेल हा देशसेवेचा मामला आहे
राफेल प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं उकरलं आहे. हिंदू या पेपरानं बाहेर काढलेली माहिती आता सर्वोच्च न्यायालय तपासणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा राफेलची चर्चा होणार आहे. मुख्य विषय असा की राफेल विमानाच्या नेमक्या किमती काय, कितीनं वाढल्या, आणि कां वाढल्या. ही माहिती गुप्तता कायद्यानुसार लोकांसमोर ठेवता येत नाही असं सरकार म्हणालं. ही माहिती जाहीर झाली तर भारताच्या सुरक्षिततेला धोका आहे असं सरकारचं म्हणणं आहे. जनतेला, विरोधी पक्षांना भारत सरकारनं राफेल खरेदी करायला हवं आहे, त्या खरेदीला कोणाचाही विरोध नाही. त्या विमानात शस्त्रास्त्रं…