आता जॉर्जही नाहीत….

आता जॉर्जही नाहीत….

 २०४ चर्नी रोड.  १९६७ ची स.का.पाटील यांना हरवणारी ऐतिहासिक निवडणुक जॉर्जनी इथून लढवली. या इमारतीत हिंदू मजदूर पंचायत, बाँबे लेबर युनियन, म्युनिसिपल मझदूर युनियन इत्यादी अनेक कामगार संघटनांच्या कचेऱ्या असत. संयुक्त समाजवादी पक्षाचंही कार्यालय इथंच होतं.  जॉर्ज फर्नांडिस इथंच बसत. याच इमारतीत जॉर्ज यांची कामगार चळवळ कारकीर्द  आकाराला आली. असं सांगतात की जॉर्ज मुंबईत प्रथम आले तेव्हां गोदीबाहेरच्या फूटपाथवर रहात आणि या कचेरीत येत. नंतर यथावकाश ते हाकेच्या अंतरावर ह्यूजेस रोडवरच्या पानगल्लीतल्या एका छोट्या घरात रहायला गेले.  इमारतीच्या तळ मजल्यात एक बँक…

Read More Read More

संमेलनाची गर्दी आणि वाचनाची परवड

संमेलनाची गर्दी आणि वाचनाची परवड

साहित्य संमेलन सुरु असतानाच वर्तमानपत्रातून एक माहिती प्रसिद्ध झाली.  मुंबई, पुणे व इतर शहरांतली एकूण पुस्तक दुकानं आणि त्यातल्या त्यात मराठी पुस्तकं विकणारी दुकानं बंद होत चाललीयत.  काही दिवसांपूर्वी मुंबईतलं स्ट्रँड बुक स्टॉल बंद झालं त्या वेळी बरीच माणसं हळहळली. फोर्ट विभागात काम करणारी माणसं जेवणाच्या सुट्टीत या दुकानात जात असत. काही माणसं ऑफिस सुटल्यावर तिथं रेंगाळत. फोर्ट विभागात काम नसणारी दूरवर रहाणारी, उपनगरातली माणसं मुद्दाम आठवड्यातून एकदा या दुकानात जात असत. नाना प्रकारची पुस्तकं तिथं मिळत. दुकानातली माणसं कुठल्या…

Read More Read More

ब्रेक्झिट. ब्रीटनला घटस्फोटही हवाय आणि शय्यासोबतही हवीय.

ब्रेक्झिट. ब्रीटनला घटस्फोटही हवाय आणि शय्यासोबतही हवीय.

युनायटेड किंगडम (युके) युरोपीय युनियन (ईयु) च्या बाहेर पडणार की नाही? तसा निर्णय युकेच्या ५२ टक्के जनतेनं २०१६ साली घेतला खरा. पण तो अमलात येण्याची चिन्हं नाहीत. ईयुच्या बाहेर पडण्याचा प्रधान मंत्री थेरेसा मे यांचा आराखडा संसदेनं फेटाळला आहे. युके आणि युरोपियन युनियन यांनी एकत्रीत चर्चा करून बाहेर पडण्याच्या कार्यवाहीचा मसुदा ३१ मार्च २०१९ सादर करायचा असं ठरलं होतं. युकेच्या सरकारनं फार घोळ घातला. बैठकांचं गुऱ्हाळ घातलं आणि परवा एक आराखडा तयार केला.साडेपाचशे पानी दस्तैवज तयार झाला. त्याचा नेमका अर्थ…

Read More Read More

राजकारणी कधी कधी सभ्य, संवेदनशील, प्रामाणीक, विचारशील असू शकतो!

राजकारणी कधी कधी सभ्य, संवेदनशील, प्रामाणीक, विचारशील असू शकतो!

राजकारणी कधी कधी सभ्य, संवेदनशील, प्रामाणीक, विचारशील असू शकतो! || To Castle and Back Vaclav Havel || कॅसल म्हणजे किल्ला म्हणजे झेक प्रेसिडेंटचं निवास स्थान. व्हाक्लाव हावेल १९८९ ते २००३ या काळात झेकोस्लोवाकियाचे प्रेसिडेंट होते. प्रेसिडेट होण्यापूर्वी ते एक नाटककार होते, रशियातल्या कम्युनिष्ट सत्तेविरोधात लिहिल्याबद्दल त्यांना ४ वर्ष तुरुंगात काढावी लागली होती.कम्युनिष्ट सत्ता उलथवणारी मखमली क्रांती झेक जनतेनं केली आणि हावेल यांना प्रेसिडेंटपदी बसवलं. राजकारण हा हावेल यांचा पिंड नव्हता. पूर्णपणे नाटकात बुडालेला माणूस. राजकारणाबद्दल घृणा असणारा आणि विचारवंताच्या वळणानं…

Read More Read More

नसिरुद्दीनको गुस्सा क्यों आता है

नसिरुद्दीनको गुस्सा क्यों आता है

नसिरुद्दीन शहा प्रॅक्टिसिंग मुस्लीम नाहीत. ते मशिदीत जात नाहीत, मुस्लीम माणसं जे धार्मिक विधी वगैरे करतात ते ते करत नाहीत. त्यांना भौतिक जगात काही अडलं तर त्या बाबत ते देवाचा, प्रेषितांचा, देव आणि प्रेषित यांच्या वतीनं सांगितलेल्या गोष्टीचा सल्ला किंवा मार्गदर्शन ते घेत नाहीत. भारतीय राज्यघटना, कायदा आणि स्वतःची विवेकबुद्धी यांच्या आधारे ते जगतात. त्यांच्या हातून जे काही घडतं, ते जे काही करतात ते स्वतःच्या जबाबदारीवर करतात. घातक किंवा उपकारक असं काहीही त्यांच्या हातून घडलं तर ते त्यासाठी स्वतःला जबाबदार…

Read More Read More

चला, आघाड्या तयार करण्याचा मोसम आलाय

चला, आघाड्या तयार करण्याचा मोसम आलाय

चला, निवडणुक आली. कुठल्या आघाडीत जायचं ते ठरवा. देशव्यापी एकाद्या पक्षाचं राज्य असण्याचे दिवस संपलेत. भाजपच्या आघाडीनं बिहारमधलं लोकसभेचं जागा वाटप निश्चित केलंय. बिहारमधल्या ४० जागांमधल्या १७ जागा भाजपनं स्वतःकडं ठेवल्यात, १७ जागा नितीश कुमार यांच्या जदयुला दिल्यात आणि ६ जागा पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला दिल्यात. अगदी नेटकेच लोकसमता पार्टीचे कुशवाहा भाजप आघाडीतून बाहेर पडल्यानं त्यांना ५ जागा देण्याच्या संकटातून भाजप सुटला. लोकसमता पार्टी भाजप आघाडीला रामराम ठोकून काँग्रेस आघाडीत घुसलीय. काँग्रेस आघाडीचं जरा वेगळं आहे. बिहारमधली आघाडी काँग्रेस आघाडी…

Read More Read More

बाँब, रॉकेटांच्या सहवासात लढायांचं वृत्तांकन करणारी महिला पत्रकार

बाँब, रॉकेटांच्या सहवासात लढायांचं वृत्तांकन करणारी महिला पत्रकार

मेरी कोल्विन सीरियातल्या धुमश्चक्रीच्या बातम्या देताना २०१२ साली मृत्यूमुखी पडल्या. बाबा अमर या गावामधे तीनेकशे स्त्रिया आणि मुलं सीरियन सरकारनं अडकवून ठेवली होती, बाँब वर्षाव करून त्यांना असद यांच्या सैनिकांनी मारलं. मेरी कोल्विन यांनी त्या घटनेचा वृत्तांत प्रसिद्ध केल्यावर सीरियन सरकार खवळलं. ड्रोनचा वापर करून सरकारनं त्यांचा पत्ता मिळवला, त्या घरावर अर्धा तास अनेक रॉकेट्सचा मारा करून घर आणि मेरी कोल्विनला खलास केलं. मेरी कोल्विननी लिबिया, इराक, कोसोवो, चेचन्या, पॅलेस्टाईन, सिएरा लिओने, इथियोपिया, लंका इत्यादी देशातल्या युद्धांवर वृत्तांत लिहिले. लंकेत…

Read More Read More

ब्रेक्झिट. ब्रिटीश नेते, ब्रिटीश खासदार, ब्रिटीश समाज, यांचं हसं होतंय.

ब्रेक्झिट. ब्रिटीश नेते, ब्रिटीश खासदार, ब्रिटीश समाज, यांचं हसं होतंय.

ब्रेक्झिटचा घोळ आता ब्रेक्झिट हा एक विनोद झाला आहे. एकाद्या देशाचं इतकं हसं यापुर्वी कधी झालं नसेल. २०१७ मधे ब्रीटननं युरोपीय युनीयनमधून (युयु) बाहेर पडायचा निर्णय घेतला. तोही जनमत चाचणीनंतर. युयुमधे रहायचं असं सुमारे ४८ टक्के लोक म्हणत होते आणि राहू नये असं ५२ टक्के लोक म्हणत होते. म्हणजे अगदीच निमुळत्या बहुमतानं निर्णय झाला. हा निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी थेरेसा मे यांनी घेतली, त्यासाठी त्या पंतप्रधान झाल्या. २०१९ च्या मार्चमधे बाहेर पडायचं ठरलं आणि त्यासाठी लागणारे कागद, करार, देवाणघेवाण यांच्या…

Read More Read More

गोरक्षण, सबरीमाला, राममंदीर. दांडगाई नको.

गोरक्षण, सबरीमाला, राममंदीर. दांडगाई नको.

दांडगाई करणाऱ्यांना आवरा. उत्तर प्रदेशात बुलंदशहरमधे एका पोलिस ठाण्यावर नागरिकांनी हल्ला केला, ठाण्याला आग लावली. पोलिस आणि नागरीक यांच्यात धुमश्चक्री झाली, गोळीबार झाला. गोळीबारात दोन जण ठार झाले पैकी एक पोलिस अधिकारी होता. योगेश राज या नावाच्या बजरंग दलाच्या एका तरूण कार्यकर्त्याच्या पुढाकारानं ही घटना घडली. योगेश राजला गावात प्राण्यांचे सांगाडे सापडले. योगेश राजचं म्हणणं होतं की ते गायीचे सांगाडे होते. योगेश काही लोकांना घेऊन पोलिस ठाण्यात गेला. पोलिसांनी गोहत्या करणाऱ्यांना पकडावं, शिक्षा करावी अशी योगेशची मागणी होती. केवळ कोणीतरी…

Read More Read More

दी इकॉनॉमिस्टचा १७५वा वाढदिवस

दी इकॉनॉमिस्टचा १७५वा वाढदिवस

दी इकॉनॉमिस्ट या सुरवातीला लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकानं १७५ वर्षं पूर्ण केली. पावणेदोनशे वर्षाच्या काळात सारं जग अनेक स्थित्यंतरांतून गेलं. बहुतेक सगळी स्थित्यंतरं इकॉनॉमिस्टनं नोंदली, अभ्यासली. इकॉनॉमिस्टचे मालक संपादक विल्सन हे खटपट्ये, समाजात बदल घडवू पहाणारे सक्रीय कार्यकर्ते होते. कार्यकर्ता, विचारवंत आणि पत्रकार असं मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वात होतं. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, ब्रीटननं घडवलेली औद्योगीक क्रांती या घटनांनी सारं जग बदलून टाकलं. जगभरात नवनवे विचार आणि विचारधारा या प्रसंगांतून जन्माला आला. या घालमेलीत लिबरलिझमचा विचार विल्सन यांनी घडवला. अॅडम स्मिथ,…

Read More Read More