पाकिस्तानातलं धर्मनिंदा प्रकरण

पाकिस्तानातलं धर्मनिंदा प्रकरण

पाकिस्तानचा धर्मनिंदा कायदा, त्या कायद्याचा वापर, त्याचा अमल इत्यादी गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, आसिया बीबीला पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयानं निर्दोष ठरवून सोडल्यावर. आसिया बीबीवर खटला झाला होता, तिनं धर्मनिंदा केली म्हणून. खालच्या दोन न्यायालयांनी तिला दोषी ठरवून फाशी जाहीर केल्यावर २००९ मधे ती तुरुंगात गेली. खटला सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयानं तिची सुटका केली. त्यानंतर घडलेलं रामायण नंतर पाहूया. पण त्या आधी घटना काय होती ते पाहूया. आसिया बीबी नानकाना जिल्ह्यातल्या गावात शेतमजुरी करत असे….

Read More Read More

सीरिया यादवी युद्धातल्या होरपळीतलं माणसांचं जगणं

सीरिया यादवी युद्धातल्या होरपळीतलं माणसांचं जगणं

No Turning Back LIFE, LOSS, AND HOPE IN WARTIME SYRIA Rania Abouzeid  ।। २०११ पासून सीरियात यादवी चालली आहे. पाच लाख माणसं या यादवीत मारली गेली. त्यातली बहुतांश सरकारच्या गोळ्या आणि छळाला बळी पडली. दीडेक कोटी माणसं बेघर झाली. बहुतेकांची गावंच उध्वस्थ झाल्यानं त्यांना सीरियात इतरत्र जावं लागलं किंवा परदेश गाठावा लागला. रानिया अबुझैद या पत्रकार महिलेनं यादवीवर लिहिलेलं पुस्तक सीरियन यादवी घडत असताना सीरियन समाज ती कशी सहन करत होता, कशी जगत होता ते दाखवतं. सामान्यतः जनतेला युद्ध या…

Read More Read More

अमेरिकन मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा

अमेरिकन मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा

अमेरिकेतली मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली. अधांतरी अशासाठी की संसदेच्या दोन सभागृहांमधलं काँग्रेस हे सभागृह डेमॉक्रॅट्सच्या ताब्यात गेलं आणि सेनेट हे सभागृह रीपब्लिकनांच्या ताब्यात राह्यलं. ही निवडणुक ट्रंप या विषयावर होती. ट्रंपच्या बाजूनं कोण आणि विरोधातले कोण या मुद्द्यावर मतदान झालं. या निवडणुकीचे काही विशेष आहेत. काँग्रेसमधे १०२ महिला निवडून आल्यात. अमेरिकेत महिलांना राखीव जागा नसतांना महिला प्रतीनिधींची संख्या वाढतेय हे विशेष. बहुतेक प्रतिनिधी, दोन वगळता, डेमॉक्रॅटिक आहेत. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या प्रथमच स्थानिक आदिवासी म्हणजे मूळ निवासी महिला निवडून…

Read More Read More

अमीत शहा, निवडणुका खुश्शाल जिंका, पण कृपया हिंदू समाजाला चिखलात लोटू नका.

अमीत शहा, निवडणुका खुश्शाल जिंका, पण कृपया हिंदू समाजाला चिखलात लोटू नका.

अमित शहा म्हणाले की अमल होणार नाहीत असे निर्णय न्यायालयानं देऊ नयेत. संदर्भ होता सबरीमाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय. रजस्वला स्त्रीनं अय्यपाच्या दर्शनाला जाऊ नये अशी परंपरा कोणी तरी कधी तरी तयार करून ठेवली होती. रजस्वला स्त्रीला महिन्याला पाळी येते तेव्हां रक्तस्राव होतो, म्हणजे ती स्त्री अशुद्ध असते, म्हणून तिनं अयप्पाकडं जाता कामा नये असं परंपरा सांगते. ही परंपरा शास्त्रीय ज्ञानाच्या अभावी निर्माण झाली होती. पाळी येणं नैसर्गिक असतं, त्यात पाप पुण्य,शुद्धाशुद्धतेचा संबंध नाही हे विज्ञानानं सांगितल्याचा आधार घेऊन…

Read More Read More

गटारावरचं झाकण निघालं, दुर्गंधी व विषार हे वास्तव कळलं.

गटारावरचं झाकण निघालं, दुर्गंधी व विषार हे वास्तव कळलं.

जे झालं ते बरंच झालं. पोलिस हे प्रकरण काय आहे ते कळलं तरी. सीबीआयचे उपसंचालक देवेंद्र कुमार अटकेत आहेत. लाचबाजीचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना यांच्यावर लाचबाजीचा आरोप असून त्यांची चौकशी चाललीय. त्यांनाही अटक होऊ शकते. सीबीआयचे विद्यमान संचालक आलोक वर्मा यांच्यावर अस्थाना यांनी लाचबाजीचा आरोप केला आहे. वर्मा आणि अस्थाना या दोघांनाही कामावरून दूर करून त्यांच्या जागी नागेश्वर राव या संचालकांची नेमणूक झाली. त्यांच्या विरोधातही सीबीआयमधे भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत. थोडासा तपशील कळावा म्हणून राकेश अस्थाना यांचं उदाहरण…

Read More Read More

२०१८ नोबेल अर्थशास्त्र बक्षीस. पारंपरीक लेबलं उचकटली.

२०१८ नोबेल अर्थशास्त्र बक्षीस. पारंपरीक लेबलं उचकटली.

आर्थिक विकास आणि ज्ञान निर्मिती; पर्यावरण प्रदुषण आणि आर्थिक धोरण; या दोन एकमेकांशी संबंधित नसलेल्या पण महत्वाच्या विषयावर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या दोन अर्थशास्त्रींना २०१८ सालचं नोबेल पारितोषिक मिळालंय. पॉल रोमर यांनी १९८६ आणि १९९० मधे प्रकाशित केलेल्या प्रबंधांचा विचार नोबेल समितीनं केला. प्रबंधांत त्यांनी ज्ञान निर्मिती आणि आर्थिक विकास यातील संबंधांचं विवेचन केलं आहे. रोमर हार्वर्डमधे प्रोफेसर होते आणि सध्या न्यू यॉर्क विश्वशाळेत संशोधन करतात. काही काळ ते विश्व बँकेचे आर्थिक सल्लागारही होते. विल्यम नॉर्डहॉस येल विश्वशाळेत अर्थशास्त्र शिकवतात. १९७०…

Read More Read More

२२ जुलै. हलवून टाकणारा, कालवाकालव करणारा चित्रपट

२२ जुलै. हलवून टाकणारा, कालवाकालव करणारा चित्रपट

२२ जुलै. नेटफ्लिक्सवर १० ऑक्टोबरला प्रकाशित झालेली २२ जुलै पहात असताना मनात येतं की यंदाच्या ऑस्करमधे या फिल्मचा नंबर लागू शकेल. नॉर्वेमधे दहशताद्यानं एक इमारत उडवली आणि एका बेटावर शिबिरासाठी जमलेल्या ६९ मुलांना ठार मारलं असा विषय चित्रपटाच्या केंद्रात आहे. विषयामधे प्रचंड नाट्य आहे, थरार आहे आणि त्याला प्रचंड दृश्य मूल्य आहे. थरार आणि नाट्य हे दोन घटक चित्रपट मर्यादेत ठेवतो आणि माणसं, माणसांतले संबंध, माणसातल्या विकृती, माणाची लढाऊ वृत्ती, माणसाचं शहाणपण आणि मूर्खपणा इत्यादी पैलू दाखवतो. दोन चित्रपटांची आठवण…

Read More Read More

मोदी शहा पक्षाचं हमी भावाचं नाटक

मोदी शहा पक्षाचं हमी भावाचं नाटक

२ ऑक्टोबर रोजी सुमारे तीसेक हजार शेतकरी आपलं रडगाऱ्हाणं घेऊन दिल्लीत गेले. पोलिसांनी त्यांच्यावर पाणी आणि लाठ्यांचा मारा केला. अनेक जुन्या जखमांत आणखी एका जखमेची भर घालून शेतकरी शेतोशेती परतले. ४ ऑक्टोबर रोजी मोदीशहा सरकारनं गहू, नाचणी ही धान्यं; मसूर, चणा या डाळी, मोहोरी या पिकांच्या रब्बीच्या हमी भावात वाढ जाहीर केली. नोव्हेंबर महिन्यातच राजस्थान आणि मध्य प्रदेश या मोदीशहा पक्षाच्या राज्यात निवडणुका आहेत. तिथं जनतेमधे चलबिचल आहे, जनता मोदीशहा सरकारं पाडण्याच्या बेतात आहे अशा बातम्या आहेत. वरील पिकं वरील…

Read More Read More

ट्रंपना उघडं करणारं बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक

ट्रंपना उघडं करणारं बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक

ट्रंपना उघडं करणारं बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक वॉटरगेट प्रकरण शोधून काढणाऱ्या बॉब वुडवर्ड यांचं ट्रंपांचे व्हाईट हाऊसमधले दिवस या विषयावरचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं. ट्रंप कसे निर्णय घेतात, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे यावर हे पुस्तक प्रकाशझोत टाकतं. ।। पुस्तकाच्या सुरवातीच्या पानावर बॉब वुडवर्डनी डोनल्ड ट्रंप यांचा एक वाक्यं अवतरलं आहे. Real power is ….fear. बळाचा वापर करून, धादांत खोटं बोलून, अवास्तव आणि प्रमाण नाकारणारी वक्तव्य करून समोरच्या माणसाला घाबरवणं हे ट्रंप यांचं वैशिष्ट्यं प्रस्तुत पुस्तकात पानोपानी प्रत्ययाला येतं. ट्रंपनी निवडणुक…

Read More Read More

समाज म्हणजे निवडक वस्तूंचं म्युझियम किवा आर्ट गॅलरी नव्हे

समाज म्हणजे निवडक वस्तूंचं म्युझियम किवा आर्ट गॅलरी नव्हे

समाज म्हणजे निवडक वस्तूंचं म्युझियम किवा आर्ट गॅलरी नव्हे माणसाची किमत तो किती पैसे मिळवतो यावरूनच करायची का? हा प्रश्न इराणमधून स्थलांतरीत झालेल्या रोया हक्कियन डोनल्ड ट्रंपांच्या अमेरिकेला विचारत आहेत. कारण ट्रंप बाहेरच्या माणसांना देशात घेताना त्यांची पैसे मिळवण्याची क्षमता ही कसोटी लावणार आहेत. वरील प्रश्न त्यांनी “Journey from the Land of No: A Girlhood Caught in Revolutionary Iran” या त्यांच्या ताज्या पुस्तकात उपस्थित केलाय. रोया हक्कियन एक कवयित्री आहेत. रोया १९८५ साली अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. खोमेनी यांचं धर्मराज्य इराणमधे…

Read More Read More