राजदूताची कहाणी
विल्यम बर्न्स यांनी १९८२ साली अमेरिकेच्या परदेश नीती खात्यात प्रवेश केला. रोनाल्ड रेगन, मोठे बुश, बिल क्लिंटन, धाकटे बुश आणि बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेखाली परदेश खात्यात त्यांनी विविध पदांवर राहून डिप्लोमसी केली. शेवटी डोनल्ड ट्रंप यांची कारकीर्द सुरू होतांना २०१४ साली त्यांनी परदेश खात्याला रामराम ठोकला. कॉन्सुलेटमधे लोकांना व्हिसे देण्यापासून सुरवात करून ते उप परदेश मंत्री या पदापर्यंत पोचले. वाटेत ते जॉर्डन आणि रशियात राजदूतही होते. ३२ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी छोटी मोठी कामं केली. २०१५ साली इराणशी केलेला अणू करार…