उतरणीवरचा भाजप. २०१९ ची निवडणूक वैचारिक घुसळण व ध्रुवीकरणाची सुरवात ठरावी.
काँग्रेस या स्वातंत्र्य आंदोलनाचा जन्म १८८५ साली झाला. नाना विचार, नाना धर्म, नाना पंथ, नाना व्यक्तिमत्व काँग्रेस चळवळीत सामिल झाली. स्वातंत्र्य मिळालं आणि १९४७ साली काँग्रेस हा राजकीय पक्ष निर्माण झाला. माज आणि भ्रष्टाचार याची लागण १९५५ पासूनच सुरु झाली होती. नेहरू, शास्त्री व अन्य चारित्र्यवान आणि विचार करणाऱ्या नेत्यांनी पक्ष सावरला होता. ते गेले आणि घसरण सुरु झाली. इंदिरा गांधीनी पक्षाच्या घसरणीला गती दिली. व्यक्तिगत स्वार्थ आणि त्याला सिद्दांताची तकलुपी जोड यांचा वापर त्यानी केला. १९६७ साली काँग्रेसला झटका…