संमेलनाची गर्दी आणि वाचनाची परवड
साहित्य संमेलन सुरु असतानाच वर्तमानपत्रातून एक माहिती प्रसिद्ध झाली. मुंबई, पुणे व इतर शहरांतली एकूण पुस्तक दुकानं आणि त्यातल्या त्यात मराठी पुस्तकं विकणारी दुकानं बंद होत चाललीयत. काही दिवसांपूर्वी मुंबईतलं स्ट्रँड बुक स्टॉल बंद झालं त्या वेळी बरीच माणसं हळहळली. फोर्ट विभागात काम करणारी माणसं जेवणाच्या सुट्टीत या दुकानात जात असत. काही माणसं ऑफिस सुटल्यावर तिथं रेंगाळत. फोर्ट विभागात काम नसणारी दूरवर रहाणारी, उपनगरातली माणसं मुद्दाम आठवड्यातून एकदा या दुकानात जात असत. नाना प्रकारची पुस्तकं तिथं मिळत. दुकानातली माणसं कुठल्या…