१९०९ सालचा दिवाळी अंक, मनोरंजन.

१९०९ सालचा दिवाळी अंक, मनोरंजन.

१९०९ साली प्रसिद्ध झालेल्या मनोरंजन या मासिकाच्या दिवाळी अंकाच्या काही प्रती सध्या पार्ल्यातल्या मॅजेस्टिक बुक डेपोत मिळत आहेत. काशीनाथ रघुनाथ मित्र हे मनोरंजनचे संपादक प्रकाशक.  संपादक म्हणतात की मनोरंजनची ही१५ वी दिवाळी आहे. १९२ पानांचा मजकूर आणि २७ पानांची जाहिरात आहे.   अनेक मोठ्या लेखकांचे लेख यायचे राहिले, अनेकांचे लेख आले पण कंपोज व्हायचे राहिले, अनेकांचे लेख कंपोज झाले पण छपाईच्या वेळापत्रकात न बसल्यानं प्रसिद्ध करता आले नाहीत असं संपादकांनी लिहिलंय. निर्णय सागर, कर्नाटक प्रेस आणि बाँबे वैभव प्रेस या…

Read More Read More

विन्सटन चर्चिल यांच्या जीवनावरचे तीन चित्रपट

विन्सटन चर्चिल यांच्या जीवनावरचे तीन चित्रपट

२०१७ सालात विन्स्टन चर्चिल यांच्यावर तीन चित्रपट झाले.      ‘ डंकर्क ‘, ‘ चर्चिल ‘, ‘ डार्केस्ट आवर ‘. पैकी ‘ डार्केस्ट अवर ‘ला ऑस्करची सहा नामांकनं आहेत. उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट रंगभूषा इत्यादी. विन्स्टन चर्चिल. यूकेचे पंतप्रधान. नोबेल पारितोषिक विजेते. चित्रकार. लेखक. नौदल अधिकारी. पत्रकार. भाषाजाणकार. इंग्रजीचा अर्धा शब्दकोष त्यांना पाठ होता असं म्हणत. डार्केस्ट आवरमधेच एक राजकारणी म्हणतो ”  “He mobilized the English language and sent it into battle.”   बीबीसीनं केलेल्या एका पहाणीत लोकांनी त्यांना ब्रीटनमधला सर्वात ग्रेट…

Read More Read More

ट्रंप. अशा माणसाला लोकांनी कां निवडलं?

ट्रंप. अशा माणसाला लोकांनी कां निवडलं?

रशियन लोकांशी ट्रंपनी बोलणी करणं देशद्रोहासारखं आहे हे फायर अँड फ्युरी या पुस्तकातलं वाक्य प्रसिद्ध झालं आणि मायकेल वुल्फ यांनी लिहिलेलं हे पुस्तक गाजू लागलं. प्रेसिडेंट ट्रंप यांच्या भोवती व्हाईट हाऊसमधे कोण कोण असतं, ट्रंप यांचे निर्णय कसे होतात, ट्रंप यांचं व्यक्तिमत्व कसं आहे इत्यादी गोष्टी   या पुस्तकात लेखकानं सांगितल्या आहेत. डॉन आणि एरिक ही ट्रंप यांची दोन मुलं ट्रंप यांचा आर्थिक कारभार सांभाळतात. ट्रंप यांची प्रचार मोहिमही त्यांनीच  सांभाळली. या दोघांवर ट्रंप यांची मदार असते. त्या दोघांबद्दल ट्रंप आसपासच्या…

Read More Read More

अफगाणिस्तानचा हिशोब. १ लाख कोटी डॉलर आणि ३० हजार प्रेतं

अफगाणिस्तानचा हिशोब. १ लाख कोटी डॉलर आणि ३० हजार प्रेतं

अफगाणिस्तानात जानेवारी २०१८च्या शेवटल्या आठवड्यात ३ स्फोट झाले आणि सुमारे ३०० माणसं मेली. दर तिसऱ्या चौथ्या दिवशी अफगाणिस्तानात कुठं ना कुठं तरी स्फोट होत असतो, माणसं किडामुंगीसारखी मरत असतात. स्फोट घडवून आणण्यात तालिबान आघाडीवर आहे. तालिबानला सत्ता हवीय. अफगाणिस्तानातलं सध्याचं सरकार आपलं सरकार नाही, ते अमेरिकेचं आहे असं तालिबानचं म्हणणं आहे.  २००१ साली आपलंच म्हणजे तालिबानचं सरकार अमेरिकेनं उलथवून लावलं असल्यानं आम्ही   काहीही करून सत्ता पुन्हा मिळवणार असा तालिबानचा पण आहे. १९९६ ते २००१ या काळात तालिबाननं अफगाणिस्तानावर राज्य केलं….

Read More Read More

आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही गोष्टी साधणारा चित्रपट, पोस्ट.

आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही गोष्टी साधणारा चित्रपट, पोस्ट.

वॉशिंग्टन पोस्ट, प्रकाशक कॅथरीन ग्रॅहॅम, संपादक बेन ब्रॅडले. पेंटॅगॉन पेपर्स, वॉशिंग्टन पोस्ट, पत्रकारीचा इतिहास. वियेतनाममधे अमेरिकनं शस्त्रं, सैनिक, खूप निःशस्त्र आणि निरपराध माणसं मारली. वियेतनामीनी चिकाटीनं अमेरिकन संकटाला तोंड दिलं, अमेरिका पराभूत झाली. हे ढळढळीत सत्य अमेरिकन सरकार अमेरिकन जनतेपासून लपवत होतं. वॉशिंग्टन पोस्टचे व्यवस्थापकीय संपादक बेन ब्रॅडलेनी रँड कॉर्पोरेशनकडं गोळा झालेली माहिती मिळवली, माहितीवर आधारीत लेखमाला पेंटॅगॉन पेपर्स या शीर्षकानं सुरु केली. पोस्टवर दबाव आला. सरकारनं बंदी घातली. पोस्टची लायसेन्सेस रद्द केली, पोस्ट हा देशद्रोह करत आहे असं म्हणत…

Read More Read More

खेड्याचा विकास, धोरणाचा अभाव

खेड्याचा विकास, धोरणाचा अभाव

विकास यादीत १८१ देशात भारताचा क्रमांक १३१ वा लागतो. भारतातल्या  ४० टक्के मुलांची वाढ खुंटलेली असते, त्यांचं वजन कमी असतं. भारतात ५० टक्के स्त्रियांच्या रक्तात लोहाचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूप कमी असतं. माणसांना किती पौष्टिक आहार मिळतो या कसोटीवर भारत बांगला देश, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्याही मागं आहे. बहुसंख्य मुलांची वाचन क्षमता कमी आहे, पाचवीतल्या मुलाची वाचनक्षमता दुसरीत अपेक्षा असते त्या पेक्षा कमी असते. आवश्यक तेवढी हॉस्पिटल्स, दवाखाने, डॉक्टर्स, नर्सेस नाहीत. बहुसंख्य गावांत वीज नाही, जिथं वीज पोचली आहे तिथंही ती चोविस…

Read More Read More

बिटकॉईन. लोकांनी स्वीकारलेला भ्रम.

बिटकॉईन. लोकांनी स्वीकारलेला भ्रम.

बिट कॉईन. खासदार कणीमोळी यांनी संसदेत प्रश्न विचारला ” बिटकॉईन हे चलन नियंत्रित करायचा विचार सरकार करत आहे काय.”  अर्थमंत्री जेटली यांनी उत्तरात सांगितलं की त्यावर एका कमीटीद्वारे सरकारचा विचार सुरू आहे परंतू सरकार बिट कॉईन हे अधिकृत चलन मानत नाही. बिटकॉईन ऊर्फ आभासी नाणं ही एका अत्यंत डोकेबाज, कंप्यूटरी डोकं असणाऱ्या माणसाची निर्मिती आहे. सातोशी नाकोमोटो या माणसानं ते निर्मिलं.तो माणूस कोण आहे ते कोणालाच माहित नाही, कोणीही त्याला भेटलेलं नाही. काय आहे हे आभासी नाणं? नाकोमोटोनं एक अत्यंत…

Read More Read More

पुस्तकाची एकेक प्रत ३६ लाख डॉलर

पुस्तकाची एकेक प्रत ३६ लाख डॉलर

सॉदेबीज (sothebey’s) ही कंपनी मौल्यवान वस्तू गोळा करून त्यांचा लिलाव करते. कंपनीची माणसं जगभर फिरून कुठं कोणत्या वस्तू उपलब्ध आहेत, कोण काय विकायला तयार आहे, कोणती मौल्यवान वस्तू कुणाकडून मिळवायची याचा हिशोब ही कंपनी करते. व्यवसाय आहे. घेतलेल्या किमतीच्या जास्तीत जास्त पटीत लिलावाची बोली लागली पाहिजे.  वस्तूची बाजारात कोणती किमत येईल त्याचा योग्य अंदाज घेणं हे कसब असतं. चांगली किमत येईपर्यंत वस्तू थोपवून ठेवाव्या लागतात. मौल्यवान वस्तूत पुस्तकंही येतात. डेवनशायरच्या डचेस, डेबोरा यांच्याकडल्या वस्तू सोदेबीजनं मिळवल्या. त्यात पुस्तकंही होती. एक…

Read More Read More

बलात्कार, एक मामुली गोष्ट

बलात्कार, एक मामुली गोष्ट

अरे तू बलात्कार केलायस. उंह: त्यात काय मोठंसं. अरे ती जखमी झालीय. औषधोपचार करा. हवं तर मी पैसे देतो. अरे ती मेलीय. जा, तिच्या नातेवाईकांना भरपाई द्या. अरे पण तिला त्रास देण्याचा अधिकार तुला कोणी दिला. अधिकाराचा काय प्रश्न. माझी गरज होती, मी भागवली. १४ डिसेंबर २०१७.गाव, बोको. जिल्हा कामरुप, आसाम. आई वडील गावाजवळच्या वीट भट्टीवर कामाला गेले होते. १४ वर्षाची मुलगी घरी होती. काही जण (नेमके किती?) घरी पोचले. मुलीला पकडून गावात अन्यत्र नेलं. सर्वांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला.इतका…

Read More Read More

पास्ता आणि रसगुल्ला

पास्ता आणि रसगुल्ला

इटालीतल्या पार्मा या शहरात पास्ता तयार करण्याची स्पर्धा भरली होती. स्पर्धेचं शीर्षक होतं ‘ पास्ताचं भविष्य ‘. भविष्यात पास्ता कसा असेल.बरिला या पास्ता तयार करणाऱ्या कंपनीनं स्पर्धा स्पॉन्सर केली होती. पास्ता हा इटालियन लोकांच्या अभिमानाचा आणि अस्मितेचा विषय. खरा पास्ता फक्त आम्हीच तयार करू शकतो असं इटालियन लोकांना वाटतं. इटालियन पदार्थ वैश्विक करण्याची खटपट बरिला करत असते. जास्तीत जास्त आपला पास्ता जगभरात खपवणं हा कंपनीचा फंडा. जगभरातले फार म्हणजे फार लोकप्रीय आचारी (शेफ) स्पर्धेसाठी पार्मात गोळा झाले होते. टोकियो, लंडन,…

Read More Read More