‘ फादर ‘ बाप, नसीरुद्दीन शहा
पृथ्वी थेटर पावणे नऊ झाले होते. माणसं दरवाजाबाहेर रांग करून उभी होती. शांतपणे. हातात फादर या नाटकाचं ब्रोशर. दहाएक मिनिटांनी दरवाजा उघडणार होता. गोंगाट नव्हता, माणसं आपसात किंवा सेलफोनशी कुजबुजत होती, ओठ हालत होते, ध्वनी उमटत नव्हता. दरवाजा उघडला. माणसं अलगतपणे थेटरात पोचली. रंगमचाच्या जमिनीवर रूंद पांढऱ्या चिकटपट्ट्यांनी खोल्यांच्या भिंतींची जागा आखली होती. तीन खोल्या. एक किचन. एक लिविंग रूम आणि एक अशीच खोली. पाच ते सहाच फर्निचर वस्तू मंचावर. मंद प्रकाश. मंचाच्या तीन बाजूंनी बसायची सोय. ट्रेनमधे पूर्वी…