जुनी पुस्तकं, दर्जेदार कचरा.

जुनी पुस्तकं, दर्जेदार कचरा.

जुनी पुस्तकं, दर्जेदार कचरा. अमेरिकेत लोकांकडं बऱ्यापैकी पैसे असतात. प्रवास करायला निघताना बरेच अमेरिकन एकादं पुस्तक विकत घेतात आणि प्रवास संपल्यानंतर पुस्तक विमानतळावरच्या किवा रेलवे स्टेशनवरच्या कचऱ्याच्या टोपलीत टाकून देतात. मायामीच्या किवा कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर अनेक पुस्तकं पडलेली असतात, ओली होऊन कुजत असतात.  हे जितकं खरं तितकंच अमेरिकन माणसं जुनी पुस्तकं टाकून देत नाहीत, विकतात, विकत घेतात हेही तितकंच खरं. म्हणूनच अमेरिकाभर जुनी पुस्तकं घेणारी आणि विकणारी किती तरी महाकाय दुकानं आहेत. ।। बेंट कॉर्नर्स युज्ड बुक्स. जुन्या पुस्तकाचं दुकान. …

Read More Read More

ट्रंप हा भीषण माणूस कां लोकप्रिय होतोय?

ट्रंप हा भीषण माणूस कां लोकप्रिय होतोय?

   ट्रंप हा भीषण माणूस कां लोकप्रिय होतोय? THE WORST PRESIDENT IN HISTORY THE  LEGACY OF BARACK OBAMA     MATT MARGOLIS & MARK NOONAN Victory Books डोनल्ड ट्रंप एक भीषण माणूस आहे. स्वतःचा ब्रँड तयार करणं हे त्याच्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट आहे. घटं विंद्यात, पटं छिंद्यात. लोकांचं लक्ष वेधणं हेच तंत्र. तो पक्षाचा कार्यकर्ता नाही. त्याचा कुठल्याही विषयाचा अभ्यास नाही. व्यवसायातही लोकांना फसवण्याचा त्याचा इतिहास आहे. देशाचं नेतृत्व करण्यासाठी आवश्यक गुण त्याच्याजवळ नाहीत. सुरवातीलाच त्यांनी सांगून टाकलं की मेक्सिकन…

Read More Read More

फक्त ३५० पिरहा आदिवासीं उरलेत

फक्त ३५० पिरहा आदिवासीं उरलेत

  पेरू या दक्षिण अमेरिकेतील देशात  पिरहा (Piraha) या १० ते१५ हजार वर्षांपासून रहाणाऱ्या आदिवासी जमातीची आता जेमतेम ३२० माणसं शिल्लक आहेत. Maici या अॅमेझॉनच्या उपनदीच्या काठावरच्या एका जंगलात ते रहातात. ही जमात टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभ्यासकांना पिरहांच्या भाषेचा अभ्यास करतांना भाषा शास्त्रातल्या प्रचलित सिद्धांताला धक्का देणाऱ्या गोष्टी आढळल्या. सापडलेल्या वास्तवामुळं भाषा शास्त्रात एक नवीच खळबळ उडाली. पिरहा भाषेत संख्या नाही. म्हणजे एक, दोन, पन्नास असे आकडे, मोजदाद नाही.  पिरहा भाषा केवळ आठ व्यंजनं आणि तीन स्वर आहेत. इतक्या मोजक्या…

Read More Read More

मुंबई आणि भारतात टीबीचा हैदोस

मुंबई आणि भारतात टीबीचा हैदोस

टीबीच्या प्रसाराकडं दुर्लक्ष होतंय. ।। दहीहंडी खेळून मराठी संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न मुंबईत चालला असताना, मुंबई पालिकेच्या शाळेत सूर्यनमस्कार घालण्याची सक्ती करण्यावरून वाद चालला असताना, मुंबईत टीबीचे रोगी वाढलेत ही गोष्ट दुर्लक्षित राहिलेली दिसते. मुंबईत दर वर्षी सुमारे ६० हजार माणसं टीबीनं बाधित होतात. (हा आकडा २०१० सालचा आहे.) ही माणसं सरकारी, खाजगी आणि वैद्यकीचं  अपुरं (चुकीचंही) ज्ञान असणाऱ्या माणसांकडं उपचारासाठी जातात. बहुसंख्य माणसं खाजगी डॉक्टरकडं जातात. मोजक्या  डॉक्टरांचं वर्तन सोडल्यास बहुतेक उपचार केंद्रात पाट्या टाकल्या जातात. नियमितपणे औषध घेणं, रोगाची…

Read More Read More

सुरवातीचे चित्रपट

सुरवातीचे चित्रपट

इटालीतल्या बलोनी (Bologna) गावात एक चित्रपट उत्सव पार पडला. उत्साही मंडळी कित्येक महिने आधी नीटपणे ठरवून बलोनीच्या उत्सवाला   जातात. तिथं गेली ३० वर्षं दरवर्षी जुलै महिन्यात Cineteca ही संस्था चित्रपट उत्सव भरवते. त्यात जीर्णोद्धार केलेले सिनेमे दाखवले जातात. Cineteca ही संस्था गेली पन्नास वर्षं चित्रपट जीर्णोद्धार करत आली आहे. बलोनीमधे या संस्थेच्या कचेरीसमोर फूटबॉल मैदानाच्या आकाराचा चौक आहे. तिथं उघड्यावर हा उत्सव होतो. भलामोठा पडदा लावला जातो. हज्जारो माणसं जमिनीवर बसून सिनेमा पहातात. परवाच्या जुलै महिन्यात झालेल्या उत्सवात लाखभर…

Read More Read More

तुर्कस्तान. निरंकुष सत्तेसाठी धर्माचा वापर.

तुर्कस्तान. निरंकुष सत्तेसाठी धर्माचा वापर.

तुर्कस्तान. निरंकुष सत्तेसाठी धर्माचा वापर.  १५ जुलैचा सूर्य मावळल्यानंतर साडेसात वाजता इस्तंबूलच्या रस्त्यावर रणगाडे फिरू लागले, त्यांनी काही रस्ते अडवले. सात वाजून पन्नास मिनिटांनी हवाई दलाची लढाऊ विमानं आकाशात फिरू लागली.आठ वाजता पंतप्रधान यिलडिरीम यांनी जाहीर केलं की लष्करातली काही माणसं अनधिकृत कारवाई करत असून जनतेनं शांत रहावं. नऊ वाजता काही लष्करी अधिकाऱ्यांनी सेना  प्रमुखाना ताब्यात घेतलं आणि अंकारामधे टीव्ही स्टेशनवर ताबा मिळवला. सव्वा नऊ वाजता टीव्हीवरच्या बातम्यांत निवेदकानं जाहीर केलं की लष्करानं मानवी अधिकार आणि लोकशाही स्थापनेसाठी सरकार बरखास्त…

Read More Read More

Pnopf प्रकाशनाच्या ब्लांश नॉफ

Pnopf प्रकाशनाच्या ब्लांश नॉफ

नॉफ प्रकाशनाला शंभर वर्षं झाली. ।। The Lady with Borzoi: Blanchet Knopf, Literary Tastemaker Extraordinaire. Laura Claridge.  ।। नॉफ (Knopf) प्रकाशनाला शंभर वर्षं पूर्ण झाली. १९१५ साली ब्लांश आणि आल्फ्रेड नॉफ यांनी हे प्रकाशन न्यू यॉर्कमधे सुरु केलं. अलिकडंच डबलडे आणि नॉफ दोन्ही प्रकाशनं एकमेकात विलीन झाल्यानंतर आज नॉफ डबलडे अशा संयुक्त नावानं हे प्रकाशन चालतं. या प्रकाशनाच्या इतर फांद्याही आहेत. बर्टेल्समान या प्रकाशनाची नॉफची भागीदारी आहे. बर्टेलन्समन,  रँडम हाऊस आणि पेंग्विन आता एकत्र झाले आहेत. म्हणजे नॉफ, डबलडे, बर्टेल्समन,रँडमहाऊस…

Read More Read More

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आयएसचा प्रवेश

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आयएसचा प्रवेश

कार्लोट्टा गॉल या पत्रकार २००० ते २०१२ या काळात अफगाणिस्तान पाकिस्तानात मुक्काम करून होत्या. त्यांनी दी राँग एनेमी नावाचं पुस्तक लिहिलंय. अमेरिकेचा खरा शत्रू तालिबान नसून पाकिस्तान आहे हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. तालिबान फोफावलं याला पाकिस्तानच कारणीभूत आहे असं त्या आपल्या पुस्तकात सविस्तर उदाहरणं देऊन मांडतात.  अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात आता आयएस डोकं वर काढत आहे यालाही पाकिस्तानलाच जबाबदार धरायचं काय? ।। क्वेट्ट्यात सिविल हॉस्पिटलमधे बलुचिस्तान बार संघटनेचे अध्यक्ष बिलाल अन्वर कासी सकाळी तिथं भरती झाले होते.त्यांना दोन मोटारबाईकवर स्वार…

Read More Read More

गोरक्षक आणि शरीयारक्षक

गोरक्षक आणि शरीयारक्षक

गोरक्षक आणि शरीयारक्षक  गुजरातेत उनामधली घटना. परंपरेनं जनावरांचं कातडं काढण्याचा व्यवसाय करणाऱ्या बालू सर्वैय्या आणि त्याच्या कुटुंबातल्या  सहा माणसांना गोरक्षकांनी बडवून काढलं. गोरक्षकांचं म्हणणं होतं की त्या लोकांनी गाय मारली.  गाय मारली की मेलेल्या गायीचं कातडं सर्वैय्या काढत होते याची चौकशी गोरक्षक मंडळींनी केली नाही. गायी मारायला गुजरातेत बंदी आहे. गाय मारणं हा गुन्हा केल्याची तक्रार आली तर चौकशी करून खटला भरण्याची  जबाबदारी पोलिसांवर असते. गोरक्षक स्वतःच पोलिस झाले.   पोलिसच नव्हे तर न्यायाधीशही झाले. खटला वगैरेच्या भानगडीत न पडता…

Read More Read More

दुसऱ्या महायुद्दावरची डॉक्युमेंटरी

दुसऱ्या महायुद्दावरची डॉक्युमेंटरी

Apocalypse: The Second World War. सहा भागातली पाच तास वीस मिनिटांची मालिका. दुसऱ्या महायुद्धावरची डॉक्युमेंटरी. सध्या नेट फ्लिक्सवर पुन्हा पाहिली जातेय. पुन्हा अशासाठी म्हणायचं की ही मालिका २००९ साली तयार झाली.  युरोपातल्या बहुतेक सर्व भाषांत तिच्या प्रती निघाल्यात. लोकांना ही डॉक्युमेंटरी आवडतेय. साधारणपणे त्याच वर्षी दुसरं महायुद्ध याच विषयावर  World War II In HD Colour ही  १३ भागात पसरलेली १० तास ३३ मिनिटांची मालिका प्रकाशित झाली होती.  अपोकलिप्स लोकांना आवडतेय कारण त्या मालिकेत दुसरं महायुद्ध हा  महाविषय सव्वापाच तासात चित्रपटाच्या…

Read More Read More