अवनती रोखणारा संपादक
कालचा सामान्य दिवस आणि वैशिष्ट्यहीन माणूस आज प्रशस्तीपात्र ठरू लागणं ही काळ उतरणीवर लागल्याची खूण असते. तथापि अशा काळातही काही माणसं थांबेठोकपणे उभी रहातात, संस्था उभ्या करतात, उतरणीवरही माणसाला शिखराकडं चालायला प्रवृत्त करतात. त्या पैकी एक माणूस म्हणजे रॉबर्ट सिल्वर्स. न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सचे संपादक. हा संपादक २० मार्च २०१७ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी वारला. रॉबर्ट सिल्वर्स या संपादकानं १९६३ साली न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स हे पाक्षिक सुरु केलं, अवनती रोखून धरली. सिल्वर्स यांनी अमेरिकन संस्कृतीला एक नाममात्र…