इराणला पर्शियन साम्राज्य करायचंय, सौदीला अरब साम्राज्य करायचंय.
सौदी इराणमधल्या प्राचीन संघर्षातलं एक नवं वळण. ।। इराण आणि सौदी अरेबिया यांनी आपसातले राजनैतिक संबंध तोडले आहेत. दूतावास बंद करावेत, राजदूतानी आपापल्या देशात परत जावं असे आदेश दोन्ही देशांनी काढले आहेत. सौदीनं अल निम्र या शिया पुढाऱ्याचा केलेला शिरच्छेद हे या घटनेचं तात्कालिक कारण आहे. सौदीचं म्हणणं होतं की अल निम्र सौदी हिताच्या विरोधात भाषणं करत होते, हिंसेला चिथावणी देत होते, सौदीविरोधात इतर देशांनी (इराणनं) कारवाई करावी असं सुचवत होते. सौदीनं त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला होता. इराणचं म्हणणं आहे…