पत्रकारी लेखनाला साहित्यिक लेखनाचं नोबेल पारितोषिक
२०१५ चं साहित्याचं नोबेल पारितोषिक स्वेतलाना अॅलेक्सिविच या पत्रकार महिलेला मिळालंय. त्यांची काही प्रसिद्ध, प्रभावी पुस्तकं अशी – व्हॉईसेस फ्रॉम चेर्नोबिल, झिंकी बॉईज (अफगाण युद्धातल्या रशियनांची कथनं), वॉर्स अनवुमनली फेस (दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या रशियन स्त्रियांच्या कहाण्या). अॅलेक्सिविच सध्या बेलारूसची राजधानी मिन्स्क या शहरात रहातात. नारोवल या गावातल्या स्थानिक पेपरात त्या काम करतात. त्यांनी लिहिलेली पुस्तकं सोवियेत युनियनच्या राज्यकर्त्यांना मान्य नसल्यानं त्यांना फ्रान्स, जर्मनीत परागंदा व्हावं लागलं होतं. बेलारुस हा त्यांचा पूर्व युरोपियन देश सोवियेत युनियनमधून मुक्त झाल्यावर त्या आपल्या…