इराण अणुकरार मोडणं म्हणजे काय
इराणबरोबर २०१५ साली झालेल्या बहुराष्ट्रीय अणुकरारातून अमेरिकेनं काढता पाय घेतला आहे. काय होता हा करार? अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, युके, रशिया, चीन या देशांच्या सहमतीनं झालेल्या या करारानुसार इराणनं तयार केलेली अणुव्यवस्था अणुशस्त्र निर्मितीकडं (वॉरहेड्स) वळवायची नाही आणि त्या दिशेनं तयार केलेली उभारणी विघटित करायची. इराण कराराचं पालन करत आहे की नाही हे पहाण्यासाठी आंतरराष्ट्रीय, तटस्थ निरीक्षक इराणमधे पाठवले जातील व त्यांना तपासणीसाठी मुक्त वाव असेल असंही करारात ठरलं होतं. या बदल्यात अमेरिका इत्यादी देशांनी इराणवर लादलेले निर्बंध काढून घ्यायचे असं…