टोन्या हार्डिंग या जिगरबाज स्केटर महिलेची अमेरिकन कहाणी.
२०१८ च्या ऑस्कर स्पर्धेमधे एलिसन जेनी यांना सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आपल्या मुलीला फटकावणारी, प्रशिक्षकाला झापणारी, मुलीवर सुरी फेकून मारणारी, चार नवरे करणारी, एक स्वतंत्र हिंसक स्त्री जेनी यांनी उभी केलीय. पुरस्काराला लायक असाच अभिनिय जेनी यांनी केलाय.चित्रपटाचं नाव आहे आय टोन्या. या चित्रपटातली मुख्य अभिनेत्री मॅकेना ग्रेस हिचं कामंही छान होतं आणि चित्रपटही थरारक होता. टोन्या हार्डिंग या स्केटिंग चँपियन स्त्रीवर चित्रपट बेतलेला आहे. १९९४ च्या सुमाराला टोन्या ही एक खरीखुरी स्त्री होती, अमेरिकेत ओरेगनमधे. आय टोन्या…