वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर.
वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर. तीही एक गंमतच. परुळकर नावाचा पक्षी माजगावकरांच्या टेबलावर आपणहून आला. पक्षी टेबलावर येणं ही माणूस ‘ चे संपादक श्री.ग.माजगावकर यांची वाकलकब. ते म्हणत की लेख आणि लिहिणारी माणसं हे पक्षी त्यांच्या टेबलावर आपणहून येऊन बसतात. विजय परुळकर हा पक्षी माजगावकरांच्या टेबलावर एके दिवशी आला. परुळकर हे व्हिडियोग्राफर, परदेशात काम करत असत. ते देशात परतले. पुण्यात बानू कोयाजी यांच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमामधे ते फिल्म्स करत असत. ते ‘ माणूस ‘ वाचत असत….